भाज्यांची आवक १३ टक्केच
By admin | Published: June 3, 2017 02:45 AM2017-06-03T02:45:22+5:302017-06-03T02:45:22+5:30
थील कै. अण्णासाहेब मगर आवार बाजार मांजरी उपसमितीमध्ये दररोज येणाऱ्या भाजीपाल्यापेक्षा शुक्रवारी केवळ १३ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : येथील कै. अण्णासाहेब मगर आवार बाजार मांजरी उपसमितीमध्ये दररोज येणाऱ्या भाजीपाल्यापेक्षा शुक्रवारी केवळ
१३ टक्के आवक झाल्याने शेतकरी व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या संपाला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. दुपारी या समितीच्या प्रवेशद्वारावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना प्राचारण केल्याने वातावरण नियंत्रित झाले. या संपामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला महाग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
या बाजार समितीमध्ये दररोज सकाळी ११.३० ते २.३० या दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व तरकारीची आवाक होत असते.
दररोज १७०० ते १८०० क्विंटल भाजीपाला येत असतो. मात्र आज शेतकऱ्यांचा माल केवळ २१४ क्विंटल एवढाच आला. त्यामध्ये टोमॅटो, पालक, मेथी, कोंथिबीर हा भाजीपाला होता.
दुपारी २.३० ला घंटा वाजला की बाजार सुटतो. मात्र आज हडपसर व परिसरातून व्यापारी व नागरिक भाजीपाला नेण्यासाठी आले होते. त्यांना मोकळ्या हाताने परतावे लागले. त्यामुळे हडपसरच्या भाजी मंडईमध्ये व इतरत्र असलेल्या भाजी मंडईतून नागरिकांना आज भाजीपाला महाग मिळणार आहे. काल आणलेला भाजीपाला आज व्यापाऱ्यांना विकण्यासाठी होता. मात्र उद्या परिस्थितीत
अशीच राहिली तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीचे दर जातील.
दुपारी दोनच्या दरम्यान काही शेतकरी व व्यापारी तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते समितीमध्ये जमल्याने उपाययोजना म्हणून पोलिसांना बोलविण्यात आले. त्यानंतर परिस्थिती आवाक्यात आली. शेतकऱ्यांच्या गाड्या बाजार समितीत आज आल्याच नाहीत.