पालेभाज्यांची आवक घटली
By admin | Published: July 17, 2017 03:50 AM2017-07-17T03:50:14+5:302017-07-17T03:50:14+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक घटली. लसूण, भुईमूग शेंग
लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक घटली. लसूण, भुईमूग शेंग यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. कांदा व भुईमूग शेंग, लसूण भाव स्थिर राहिले, तर बटाट्याचे भाव उतरले. कांदावगळता बटाट्याची आवकही घटली. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात मेथी वगळता इतर पालेभाज्यांची आवक घटली. याही सप्ताहात शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, शेपू व मेथीची, पालक यांची आवक घटली. जनावरांच्या बाजारात गाई वगळता, म्हशी, बैल शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. जनावरांच्या बाजारात एकूण २ कोटी ३० लाख रूपयांची उलाढाल झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ३८५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९० क्विंटलने वाढली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १८०५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४९५ क्विंटलने घसरली व कमाल भाव ८०० रुपयांवरून १०० रुपयाने कमी होऊन ७०० रुपये झाले. जळगाव भूईमूग शेंगाची एकूण आवक ६५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही अवक स्थिर राहिली. शेंगांचा कमाल भावही ५ हजार रुपयांवर स्थिर राहिला. या सप्तहातही बंदूक भुईमूग शेंगांची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ६ क्विंटलवर स्थिर राहिली. कमाल भावही ५००० रुपयांवर स्थिर झाले. हिरव्या मिरचीची एकूण आवक २९९ क्विंटल झाली, तर भावात घट झाली. हिरव्या मिरचीला २५०० ते ४५०० रुपये, असा कमाल भाव मिळाला.