भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:04 PM2019-03-28T23:04:59+5:302019-03-28T23:05:36+5:30

सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

Vegetable crust | भाजीपाला कडाडला

भाजीपाला कडाडला

Next
ठळक मुद्देनिफाड परिसर : पाणीटंचाईमुळे पिके करपलीआवक घटल्याने

सायखेडा : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके करपली असून, शेतमालाची आवक घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आठवडे बाजारात शेतमाल अल्पप्रमाणात विक्र ीसाठी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढते बाजारभाव शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहेत. आठवडे बाजार गरिबाच्या खिशाला महाग झाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
वर्षभर शेतमाल कवडीमोल भावात विक्र ी करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी लागणारे भांडवलदेखील वसूल झाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी पिकविलेला माल विक्रीसाठी नेला नाही.
डिसेंबर महिन्यापासून विहिरींनी तळ गाठला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना शेतीसाठी पाणी कुठून येणार? अशा परिस्थितीत उभी पिके सुकून
गेली. दोन-तीन महिन्यांपूर्वीचा परिणाम आज दिसू लागला आहे. आठवडे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. भाजीपाल्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. बाजारात विक्र ीसाठी येणारी आवक घटल्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. वर्षभर न मिळालेला भाव मिळत आहे, मोजक्या शेतकºयांना फायदा होत असला तरी सामान्य जनतेला आणि मजूरवर्गाला हे बाजारभाव न परवडणारे आहेत.
दुष्काळाच्या झळा सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. उन्हाळ्यात हाताला काम मिळत नाही, मजुरी नाही, शेतकºयांकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत कुटुंब चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.आठवडे बाजारात गगनाला भिडलेले भाजीपाल्याचे दर आज खिशाला महाग होत आहे. कोणताही भाजीपाला किमान ५० रुपये किलो दराच्या पुढे खरेदी करावा लागत आहे. उन्हाळा असल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे कुटुंब खर्च करणे अवघड झाले आहे.
- रवींद्र शिंदे, भेंडाळीशेतकºयांकडे शेतमाल कमी झाला की बाजारभाव वाढतात, शेतमालाचे भाव स्थिर राहिले पाहिजे, शेतकºयांना कायम भाव मिळाला तर त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. केवळ मालाचा तुडवडा आल्याने भावात तेजी आली नाही तर वर्षभर कवडीमोल भावात विक्र ी करावी लागली.
- कैलास डेर्ले, शिंगवेआजचे बाजारभाव
मेथी २० रु . जुडी
कोबी ३० रु . गड्डा
फ्लॉवर ७० रु . किलो
मिरची ८० रु . किलो
दोडका ८० रु . किलो
कारले ६० रु . किलो
शेपू २० रु . जुडी
टमाटे ४० रु . किलो
गिलके ६० रु . किलो

Web Title: Vegetable crust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.