शिवचरित्राच्या निर्मितीसाठी विकला भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:41 AM2018-06-14T03:41:46+5:302018-06-14T03:41:46+5:30
लहानपणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने मन वेडावले. वडिलांनी गडकिल्ले पायी फिरून दाखविले. यामुळे इतिहास डोक्यात नव्हे तर रक्तात उतरला. तेव्हापासून शिवचरित्र लिहायच्या ध्यासाने पछाडलो गेलो.
पुणे : लहानपणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने मन वेडावले. वडिलांनी गडकिल्ले पायी फिरून दाखविले. यामुळे
इतिहास डोक्यात नव्हे तर रक्तात उतरला. तेव्हापासून शिवचरित्र लिहायच्या ध्यासाने पछाडलो गेलो. अखंड साधना, भ्रमंती यातून अनेक वर्षांच्या कष्टातून शिवचरित्र जन्माला आले. मात्र, पुढे त्याची छपाई, विक्रीसाठी पैसा उभा
राहावा याकरिता पुण्याहून मुंबईला भायखळ्यातील मार्केटमध्ये कोंथिबीर विकली. त्यातून उभा राहिलो. परंतु, शिवचरित्र
निर्मितीची जिद्द सोडली नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्र निर्मितीबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा देत होते.
राजहंस प्रकाशन व्यवसायाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. या विस्ताराच्या निमित्ताने राजहंस प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यावतीने आयोजित
करण्यात आलेल्या ‘विस्तार विशेषांकाचे’ प्रकाशन
राजहंसचे संस्थापक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते
झाले.
याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी ‘राजहंसी दिवस’ च्या गप्पांमधून बाबासाहेबांना बोलते के. ले. मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिरात रसिकश्रोत्यांच्या प्रचंड गर्दीत पार पडलेल्या समारंभाला विनायकराव पाटील, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर, रसिका राठीवडेकर उपस्थित होते.
वयाची ९६ वर्षे पूर्ण
करणाऱ्या बाबासाहेबांना संकटांचा सामना करताना खचल्यासारखे झाले नाही का? यावर शिवाजीमहाराजांमुळे खचलो नाही. असे उत्तर बाबासाहेबांनी दिल्यावर रसिकांनी टाळ्यांचा क डक डाट करून त्यांच्या त्या उत्तराला मन:पूर्वक दाद दिली. याशिवाय आईचे प्रेम, शेवटपर्यंत वडिलांबरोबर जपलेले मित्रत्त्वाचे नाते यामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. काहीही झालं तरी दिलेला शब्द आणि दिलेली वेळ कधी चुकवायची नाही. हा वडिलांचा सल्ला नेहमीच पाळल्याचे नमूद केले.
१ शिवचरित्राच्या निर्मितीबद्दल गाडगीळांनी विचारले असता बाबासाहेब म्हणाले, नवव्या-दहाव्या वर्षापासून लिहायला लागलो. शिवचरित्राचे वेड लहानपणापासून होते. याचे मूळ शोधायला गेल्यास आई-वडिलांचे संस्कार असे देता येईल. लहानपणी काही विलक्षण गोष्टी घडल्या. सातत्याने कानांवर प्रेरणादायी, स्फूर्तीदायी पडत होते. पुढे मोठे झाल्यावर डेक्कन महाविद्यालयात काम करत असताना यात अनेकांचे मार्गदर्शन मिळाले.
२ भ्रमंती करून, गडकिल्ले फिरून ज्यावेळी शिवचरित्र पूर्ण झाले. त्यानंतर त्याची पुस्तकबांधणी, त्यासाठीचा खर्च, यात संघर्ष करावा लागला. एका मित्राच्या आत्याने १७ हजार रुपयांची मदत केली. त्या व्यक्तीला सहा महिन्यांतच ते पैसे परत केले. अशातच एका मित्राक डून फसवणुकीचा अनुभव आला. एकीकडे फसवणूक तर दुसरीकडे मदत यामुळे भारावून गेलो. यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळी माझ्या शिवचरित्राबद्दल कळले तेव्हा त्यांनी शाबासकी दिली.
३ आचार्य अत्रे यांनी तर आपल्या ‘मराठा’ या दैनिकात शिवचरित्रावर अग्रलेख लिहिला. आणि प्रचंड यश मिळाले. १९६८ ते साल होते. किमान २००० प्रतींची आवृत्ती होती. पुढे अवघ्या काही महिन्यांतच पहिली आवृत्ती संपून पुढील आवृत्ती सुरू करावी लागली. ‘पुरंदरेंनी शिवचरित्र महाराष्ट्रात नेले.’ या शब्दांत आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या लेखात स्तुती केली होती, असे सांगताना बाबासाहेब काहीसे भावूक झाले होते.
सिर सलामत तो
‘पगडी’ पचास...
मुलाखत ऐन रंगात आली असताना गाडगीळ यांनी बाबासाहेबांना सध्या पुणेरी पगडीवरून सुरू असलेल्या वादाविषयी काय वाटते? असा प्रश्न विचारला. यावर बाबासाहेब काय उत्तर देतात याकरिता सभागृहातील सर्वांचे कान टवकारले गेले. उत्तर देताना थोडेसे हसून ‘सिर सलामत तो पगडी पचास’ असे म्हटल्याबरोबर उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली.