भाजीपाला शेतातून थेट ग्राहकांपर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:32+5:302020-12-27T04:08:32+5:30
पुणे: वाढते शहरीकरण व उद्योग व्यवसाय नोकरी यासाठी लागणारा वेळ यातून शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले ...
पुणे: वाढते शहरीकरण व उद्योग व्यवसाय नोकरी यासाठी लागणारा वेळ यातून शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ताजा भाजीपाला फळे त्यांना उपलब्ध करून देणारी कॉपशॉप यंत्रणा म्हणून त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन एनसीडीचे विभागीय संचालक विनित नारायण (लेफ्टनंट कर्नल, निवृत्त) यांनी केले.
शहरातल्या गृहनिर्माण सहकारी सोसायटांना ताजा व विषमुक्त भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सहकार निकास महामंडळाच्यावतीने हांडेवाडीतील रूणवाल सिगल गृहनिर्माण संस्थेत कॉपशाॉपचे उद्घाटन नारायण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एनसीडीसीचे उपसंचालक संजय कुमार तसेच व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, महापालिकेचे उपायुक्त गणेश सोनुने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे नारायण आघाव, सचिन सरसमकर, अविनाश शिंदे, कमल परदेशी यावेळी उपस्थित होते.