वातावरणातील बदलामुळे बाजारात फळभाज्यांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 07:52 PM2018-03-18T19:52:19+5:302018-03-18T19:52:19+5:30
कांद्याचा कमाल भाव १००० रूपयांवरून ९०१ रुपयांवर खाली आला.
चाकण ( प्रतिनिधी ) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक चार पटीने घटून भावातही घट झाली. वातावरणातील बदलामुळे बाजारात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. कांद्याला ९०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४५०० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात ९९ रुपयांनी घट झाली. कांद्याचा कमाल भाव १००० रूपयांवरून ९०१ रुपयांवर खाली आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९१० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २९० क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव १२०० रुपये झाला. भूईमुग शेंगाची (जळगाव ) एकूण आवक ०८ क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव ७०० रुपयाने घटून ५३०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक १२ क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव ३ हजार ५०० रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ४९७ पोती आवक झाली. मिरचीला कमीत कमी २००० व जास्तीत जास्त ४००० रुपये भाव मिळाला. तसेच कडक उन्हाळा सुरु झाल्याने बाजारात कलिंगडाची हि आवक झाली. कलिंगडांना ७ ते १० रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला असल्याची माहिती आडते लहू कोळेकर, महेंद्र गोरे व संतोष खैरे यांनी दिली.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :–
कांदा - एकूण आवक - ४५०० क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०१ रुपये, भाव क्रमांक : ७०१ रुपये, भाव क्रमांक ३ : ६०१ रुपये.
बटाटा - एकूण आवक - ९१० क्विंटल. भाव क्रमांक १ : १२०० रुपये, भाव क्रमांक २ : १००० रुपये, भाव क्रमांक ३ : ७०० रुपये.
भुईमूग शेंग ( जळगाव ) - एकूण आवक ०८ क्विंटल ,भाव क्रमांक १ : ५३००, भाव क्रमांक २: ५०००, भाव क्रमांक ३: ४५०० रुपये.
लसूण - एकूण आवक - १२ क्विंटल. भाव क्रमांक १ : ३५०० रुपये, भाव क्रमांक २ : ३००० रुपये, भाव क्रमांक ३ : २५०० रुपये.
फळभाज्या :-
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-
टोमॅटो - ११९८ पेट्या ( २०० ते ५०० रू. ), कोबी - ४६८ पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - ५१७ पोती ( २०० ते ४०० रु.),
वांगी - ३३९ पोती ( ५०० ते १२०० रु.), भेंडी - ७१८ पोती ( १००० ते २००० रु.), दोडका - ५९४ पोती ( १००० ते २००० रु.),
कारली - ३८७ डाग ( १३०० ते २५०० रु.), दुधीभोपळा - २८१ पोती ( ५०० ते १००० रु.), काकडी - ३९१ पोती ( ५०० ते १२०० रु.),
फरशी - ९७ पोती ( १५०० ते २५०० रु.), वालवड - ४१९ पोती ( १००० ते २५०० रु.), गवार - १५६ पोती ( ३००० ते ५००० रू.),
ढोबळी मिरची - ४८७ डाग ( १००० ते २००० रु.), चवळी - ८९ पोती ( २००० ते ३००० रुपये ), वाटाणा - २९७ पोती ( २००० ते ३५०० रु.),
शेवगा - १८८ डाग ( १५०० ते २५०० रु.), गाजर - २३६ पोती ( ९०० ते १३०० रु. )
पालेभाज्या :–
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : -
मेथी - एकूण १६८४७ जुड्या ( ३०० ते ७०० रुपये ), कोथिंबीर - एकूण १९७६८ जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ),
शेपू - एकुण ४१९६ जुड्या ( २०० ते ४०० रुपये ), पालक - एकूण ४८७४ जुड्या ( २०० ते ४०० रुपये ).
जनावरे :-
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९५ जर्शी गायींपैकी ६५ गाईची विक्री झाली. ( १५,००० ते ५०,००० रुपये ),
१८५ बैलांपैकी ९८ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते २०,००० रुपये ), १५५ म्हशींपैकी ८५ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रुपये )
शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५८० शेळ्या - मेंढ्यापैकी ७१२० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १२०० ते १०,००० रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात १ कोटी ८० लाखाची उलाढाल झाली. तर संपूर्ण बाजाराची एकूण उलाढाल २ कोटी ६५ लाख रुपये झाली.