चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:48+5:302021-03-19T04:09:48+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर पेठ परिसरात कालपासून अपघाताची मालिका सुरू आहे. काल चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला होता. सुदैवाने चालक बचावला ...
पुणे-नाशिक महामार्गावर पेठ परिसरात कालपासून अपघाताची मालिका सुरू आहे. काल चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला होता. सुदैवाने चालक बचावला होता. येथून जवळच आज सकाळी 9 वाजता चारचाकी वाहन पलटी झाले. गाडी (क्रमांक एम. एच. 14 एफ. एम
1884 )या वाहनाचे चालक कस्तुप कांतराव वैष्णव (वय 41 रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) हे त्यांची कार घेऊन पुणे येथे जात होते. पेठ हद्दीत चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हे वाहन अचानक रस्त्याच्या कडेला पलटी झाले आहे. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाली.सदर अपघाताची माहिती दिलीप धुमाळ यांनी पोलिसांना फोनवरून दिली. आळेफाटा पोलीस महामार्ग पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे व मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राजेंद्र हिले, पोलीस जवान फिरोज मोमीन यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. उपतालुकाप्रमुख दिलीप पवळे ,अशोक राक्षे,रामदास धुमाळ यांनी यावेळी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. पुणे-नाशिक महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे रस्ता सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.