सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा
By admin | Published: January 10, 2017 02:26 AM2017-01-10T02:26:40+5:302017-01-10T02:26:40+5:30
‘मोदी सरकार हाय-हाय, पैसा आमचा कष्टाचा- नाही कोणाच्या बापाचा, मंत्रिमंडळ तुपाशी- शेतकरी मात्र उपाशी’ अशा घोषणा देऊन
भिगवण : ‘मोदी सरकार हाय-हाय, पैसा आमचा कष्टाचा- नाही कोणाच्या बापाचा, मंत्रिमंडळ तुपाशी- शेतकरी मात्र उपाशी’ अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार
सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांसह सुमारे २०
मिनिटे पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरून मोदी सरकारच्या नोटाबंदीचा निषेध केला.
या वेळी तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, भिगवण गावाच्या सरपंच हेमाताई माडगे, प्रदीप वाकसे, दशरथ माने, प्रताप पाटील, डी. एन. जगताप, तुकाराम बंडगर, महेश देवकाते, मनोज राक्षे, संदीप वाकसे, अशोक पाचांगने, विक्रम शेलार यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी खासदार सुळे यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.
या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘सरकारचे हे धोरण शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या मुळावर उठले आहे. याचा त्रास फक्त सर्वसामान्यांना होत आहे. तसेच, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून, सरकारने तातडीने निर्बंध उठवावेत. २० मिनिटे चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा
लागल्या होत्या.
या वेळी पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला भिगवण पोलिसांनी पर्यायी मार्गाने पाठविण्याची व्यवस्था केल्याने कोणताही अडचणीचा प्रसंग उद्भवला नाही. या वेळी आंदोलनामध्ये तालुक्यातून अनेक पदाधिकारी तसेच भिगवणचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देऊन रास्ता रोको मागे घेण्यात आला.