पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा
By admin | Published: January 1, 2015 11:45 PM2015-01-01T23:45:47+5:302015-01-01T23:45:47+5:30
मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनआलेल्या लाख आंबेडकरी बांधवांनीआज दिवसभर अलोट गर्दी केली होती.
कोरेगाव भिमा : भीमाकाठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष , संघटना , व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनआलेल्या लाख आंबेडकरी बांधवांनीआज दिवसभर अलोट गर्दी केली होती. यामुळे पुणे-नगर रस्त्यावर गर्दीमुळे चारही बाजूंनी येणारी वाहतूक लोणीकंद व शिक्रापूर पोलिसांनीही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे वाहतुक कोंडी मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली होती तरीही सायंकाळी वाहनांच्या कोंडी झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
बुधवार दि. ३१ रोजी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे-नगर महामार्गावरिल कोरेगाव भिमा जवळील परणे फाटा येथे विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनासह या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते. हि वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ नुसार आज सकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत पुणे-नगर महामार्गावरिल वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या.
मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनांच्या पार्कींगसाठी कोरेगाव भिमा येथिल एस. टी. स्टँड जागा , ग्रामपंचायतजवळील मैदान , डिंग्रजवाडी फाटा , वाडागाव फाटा याठिकानी पार्किंगची व्यवस्था केली होती. (वार्ताहर)
४शिक्रापूर पोलीसांनी अहमदनगर बाजुकडून पुण्याकडे येनाऱ्या वाहतुकीत बदल करित नगर-कल्याण मार्ग , शिरुर-न्हावरा फाटा मार्गे सोलापूर रस्ता , शिक्रापूर-चाकण मार्गे , शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-विठ्ठलवाडी मार्गे वाघोली , कोरेगाव भिमा-वढु-चौफुला मार्गे चाकण यामार्गावरुन वाहतुक शिक्रापूर पोलीसांनी वळविण्यात आली असल्यचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगीतले.
४तर लोणीकंद पोलीसांनी पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहतुक बायपासवरुन सोलापूर रस्त्याने केडगाव चौफुला मार्गे वळविण्यात आल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक तुकाराम जाधव यांनी सांगीतले. पोलिसांच्या नियोजनामुळे पुणे-नगर मार्गावरिल वाहतुक दोन्ही बाजुंनी वळविण्यात आल्याने दरवर्षीपेक्षा वाहतुक कोंडी कमीप्रमाणात झाली होती.