वाहन विक्री ३६ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:38 AM2018-10-21T01:38:41+5:302018-10-21T01:38:43+5:30

वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला सोनेरी झळाळी लाभली नाही. गेल्या तीन वर्षांत यंदा सर्वांत नीचांकी ५ हजार ६२६ विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) झाली आहे.

Vehicle sales fell 36 percent | वाहन विक्री ३६ टक्क्यांनी घटली

वाहन विक्री ३६ टक्क्यांनी घटली

Next

पुणे : वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला सोनेरी झळाळी लाभली नाही. गेल्या तीन वर्षांत यंदा सर्वांत नीचांकी ५ हजार ६२६ विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा महसुलात तब्बल सहा कोटी ३१ लाख रुपयांनी घट झाली आहे.
दसरा, गुढीपाडवा, दिवाळी पाडवा, अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तादिवशी वाहन, घर, सोने
अथवा एखादी नवीन वस्तू घरी आणली जाते. यंदाही त्याप्रमाणेच नागरिकांनी वाहन खरेदीसाठी रांगा लावल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत तब्बल ३६ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी (२०१७) दुचाकी ५ हजार ७४१, चारचाकी २ हजार ७५ आणि वाहतुकीच्या ८७३ गाड्यांची
विक्री झाली होती. त्यापोटी तब्बल २६ कोटी ९६ लाख ४२ हजार ८५६ रुपयांचा महसूल जमा झाला
होता. यंदा त्यात २० कोटी ६५ लाखांपर्यंत घट झाली आहे. म्हणजेच महसुलात चोवीस टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
गेल्या वर्षीपेक्षा दुचाकींची विक्री २९ टक्क्यांनी घटली असून, एकूण ४ हजार ११५ दुचाकी विकल्या गेल्या आहेत. चारचाकी गाडींच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अवघ्या ९७० चारचाकी गाड्या विकल्या गेल्या आहेत. वाहतुकीची ५४१ वाहने (३९ टक्के घट) विकली गेली आहेत.
सप्टेंबर २०१८ अखेरीस शहरातील वाहनांची संख्या ३७ लाख ६० हजार ७२५ इतकी होती. त्यात दुचाकींची संख्या २७ लाख ९१ हजार ८०८ आणि चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ९१५ इतकी आहे, तर प्रवासी आणि मालवाहतूक करणारी वाहने ३ लाख आहेत.
>दसºयाच्या काळातील वाहन विक्री
वाहन प्रकार २०१६ २०१७ २०१८
मोटारसायकल ४५४० ५७४१ ४११५
चारचाकी १७६० २०७५ ९७०
वाहतुकीची वाहने ६१६ ८७३ ५४१
महसूल २०,२९,४६,२६१ २६,९६,४२,८५६ २०,६५,०००००

Web Title: Vehicle sales fell 36 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.