पावसाने जुन्नरमधील रस्त्यावर वाहने घसरून अपघातचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:38+5:302021-06-01T04:08:38+5:30
जुन्नर शहरात जानेवारी महिन्यापासून प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. जवळपास प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण ...
जुन्नर शहरात जानेवारी महिन्यापासून प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. जवळपास प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. डांबरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात रेडी हॉटमिक्स डांबराच्या थरावर दगडाची बारीक कच टाकण्यात येते. रोड रोलरच्या रोलिंगमुळे, तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे पसरलेली कच बसून जाते. जाडसर कच रस्त्यावर तशीच राहते; परंतु यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने ही कच रस्त्यावरील उताराने वाहत येऊन सखल भागात, तसेच गतिरोधकांच्या अलीकडे साठली आहे. त्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या वाळू व कचऱ्यावरून दुचाकी वाहने घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सर्वच रस्त्यावर ही परिस्थिती आहे. नगरपालिका बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावर पसरलेली कच गोळा करावी. आरोग्य विभागाच्या रस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाडून गोळा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
जुन्नर शहरात जोरदार पावसाने रस्त्यावर वाहत येऊन पसरली गेलेली वाळूची कच, बारीक खडी.