वाहने चोरणारी दुक्कल गजाआड

By admin | Published: December 31, 2014 12:09 AM2014-12-31T00:09:04+5:302014-12-31T00:09:04+5:30

मास्टर की’चा वापर करून शहराच्या विविध भागांतून ९ चारचाकी व १० दुचाकी वाहने चोरून सोलापूरच्या ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत दुक्कलीस फरासखाना पोलिसांनी गजाआड केले.

Vehicle steals duplicate traffic | वाहने चोरणारी दुक्कल गजाआड

वाहने चोरणारी दुक्कल गजाआड

Next

पुणे : ‘मास्टर की’चा वापर करून शहराच्या विविध भागांतून ९ चारचाकी व १० दुचाकी वाहने चोरून सोलापूरच्या ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत दुक्कलीस फरासखाना पोलिसांनी गजाआड केले. याशिवाय २७ वाहने त्यांनी भंगारात निकामी केल्याचे तपासात समजले आहे.
काशिनाथ हरिभाऊ टकले (३२ माळशिरस, सोलापूर) आणि विनायक ऊर्फ चिकू कृष्णराव वाघमोडे (२५, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. भंगारात निकामी केलेल्या वाहनांमध्ये १२ चारचाकी आणि १५ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी चोऱ्या केल्या. १९९७ पासून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
टकले याचा माळशिरसमध्ये वेल्डिंगचा व्यवसाय आहे. त्याच्या दुकानासमोर बऱ्याच चारचाकी व दुचाकी वाहने उभी असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. माहितीचा पडताळा करण्यासाठी ते सोलापूरमध्ये गेले असताना टकले स्वस्तात ग्रामीण भागात वाहने विकत असल्याचे दिसून आले. ही वाहने जुनी झालेली असून ज्यांनी ही वाहने विकत घेतली, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी खास पथक स्थापन केले आहे. त्यातील शिपाई विनोद शिवले यांना टकले याच्या चोऱ्यांची माहिती समजली होती. खात्री होताच टकले यास ताब्यात घेण्यात आले. ‘मास्टर की’च्या साहाय्याने स्वारगेट, डेक्कन, मार्केट यार्ड, कोरेगाव पार्क, कोथरूड, कोंढवा, वानवडी, दत्तवाडी, सिंंहगड रस्ता, जेजुरी अशा भागातून वाहने चोरली होती. नंबर प्लेट बदलून ती माळशिरसला नेल्यानंतर विकली जात असत. आरोपी सराईत चोरटे असून, नगरमध्ये त्यांच्यावर २५हून अधिक गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी आज पत्रकार परिषदेत गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती सांगितली. सहायक आयुक्त जगदीश लोहळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंंद गायकवाड उपस्थित होते. तपास पथकातील फौजदार गिरीश सोनवणे, सुनील सोळुंके, कर्मचारी यशवंत आेंबासे, सचिन उगले, प्रणव संपकाळ, विनोद शिवले, कुलदीप पवार, विनायक शिंंदे, अमोल भोसले, संदीप पाटील, सागर केकाण, मयूर दळवी यांना या कामाबद्दल बक्षीस देणार असल्याचे तांबडे यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Vehicle steals duplicate traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.