पिंपरी: आरटीओ नोंदणीपूर्वी वाहने पळविणारे चोरटे जेरबंद, चार वाहनांसह मराठवाड्यातून आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 05:27 PM2017-08-23T17:27:42+5:302017-08-23T17:29:34+5:30

कंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद केले.

Vehicle thief arrested in Pimpri | पिंपरी: आरटीओ नोंदणीपूर्वी वाहने पळविणारे चोरटे जेरबंद, चार वाहनांसह मराठवाड्यातून आरोपींना अटक 

पिंपरी: आरटीओ नोंदणीपूर्वी वाहने पळविणारे चोरटे जेरबंद, चार वाहनांसह मराठवाड्यातून आरोपींना अटक 

Next
ठळक मुद्देकंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद पिंपरी,भोसरी, एमआयडीसी आणि चाकण परिसरातून सुमारे ४१ लाख ४४ हजार ६४६ रूपये किंमतीची वाहने पळवून नेल्याचे उघडकीस

पिंपरी, दि. 23 - कंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांनी पिंपरी,भोसरी, एमआयडीसी आणि चाकण परिसरातून सुमारे ४१ लाख ४४ हजार ६४६ रूपये किंमतीची वाहने पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. अटक करून न्यायालयात हजर केले असता, २४ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 
संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार रफिक उमर जमादार (वय ३०, चिंचवड),विष्णू भागुजी शिंगाडे (वय ४७,अजंठानगर),युनुस शौकत शेख (३५,पाचेगाव,गेवराई), अक्रम बिस्मिल्ला शेख (वय ४८,जालना), चंद्रकांत सुनील आठवले (वय २३, जालना),शब्बीर मुनीर शेख (वय ३५,जालना) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी १३ लाखांच्या दोन, एक आठ लाखाची आणि एक साडेसहा लाख रूपये किंमतीची नवीकोरी मोटार कंपनीच्या गोदामातून पळवून नेली. टेहळणी करून गोदामाच्या रखवालदाराची नजर चुकवुन चोरट्यांनी मोटारी बीड,गेवराई येथे विक्रीस नेल्या. तेथे या चोरीच्या मोटारी खरेदी करण्याची तयारी ठेवलेला जालना येथील रहिवासी मजहर खान पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे. यातील प्रमुख आरोपी रफिक जमादार हा पिंपरी चिंचवडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दुसरा विष्णू भागुजी शिंगाडे हा आरोपी निगडीतील राहणारा आहे. 
पिंपरी चिंचवड, भोसरी,चाकण परिसरातून चोरून नेलेली वाहने बीड, गेवाराई येथे विक्रीस नेल्याची माहिती संघटित गुन्हेगारी विरोधी  पथकातील ब्रम्हानंद नाईकवडी यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन आरोपींच्या शोधार्थ पथक मराठवाड्यात पाठवले. तेथे मुद्देमालासी चोरट्यांना जेरबंद केले. 
अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे ) पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नाईकवडी, सहायक पोलीस निरिक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरिक्षक पडी डी गायकवाड, पोलीस हवालदार हजरत पठाण,भालचंद्र बोरकर,दिपक भुजबळ, राज देशमुख यांच्यासह विठ्ठल बंडगर, शितल शिंदे, दत्ता फुलसुंदर यांच्य पथकाने ही कामगिरी केली. 

Web Title: Vehicle thief arrested in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.