बिबवेवाडीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:12 AM2021-05-18T04:12:18+5:302021-05-18T04:12:18+5:30
पुणे : लॉकडाऊन असतानाही शहराच्या वेगवेगळ्या टोळक्यांकडून खून, खुनाचे प्रयत्न तसेच दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत़ बिबवेवाडी भागात ...
पुणे : लॉकडाऊन असतानाही शहराच्या वेगवेगळ्या टोळक्यांकडून खून, खुनाचे प्रयत्न तसेच दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत़ बिबवेवाडी भागात टोळक्याने नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी रणजित राजू सावंत (वय १९), आदेश राजेंद्र गोरड (वय २१, दोघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ दारवटकर (वय ५८, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सावंत, गोरड आणि साथीदार दोन दिवसांपूर्वी राजीव गांधीनगर परिसरातील दत्तमंदिर चाळीत रात्री साडेनऊच्या सुमारास आले. त्यांनी या भागातील रहिवाशांना शिवीगाळ केली. हातातील काठ्या आणि सिमेंटचे गट्टू वाहनांवर फेकले. नागरिकांना दमदाटी करून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत.