Video - नो पार्किंगमधील वाहने '' हायड्रोलिक क्रेन '' उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 08:53 PM2019-03-05T20:53:20+5:302019-03-06T16:06:47+5:30
शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखा टेम्पोच्या मदतीने उचलतात़. ती शहरातील २२ वाहतूक विभागात आणली जातात़
पुणे : वाढती वाहन संख्या, अपुरी पार्किंगची व्यवस्था यामुळे अनेकदा नाईलाजाने अथवा चुकून नो पार्किंगमध्ये वाहने लावतात़. तेव्हा वाहतुक शाखेचे टेम्पो ही वाहने उचलून नेतात़. त्यावरुन अनेक तक्रारी होत असतात़. या तक्रारीचे निराकरण व्हावे व वाहनांचे नुकसान होऊ नये, म्हणून आता वाहतूक शाखेच्या वतीने यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहे़. मात्र, या पद्धतीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मोठा भुर्दंड बसणार आहे़.
शहरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणारी वाहने वाहतूक शाखा टेम्पोच्या मदतीने उचलतात़. ती शहरातील २२ वाहतूक विभागात आणली जातात़ तेथे वाहनचालकांकडून दंड व टेम्पोचा टोईंग खर्च वसुल केला जातो़. ही वाहने टेम्पोतील कर्मचारी एखाद्या टोळधाडीसारखी येऊन वाहन उचलतात़. वाहन उचलताना तशी कशीही उचलली जाते़. त्यातून अनेकदा वाहनांचे नुकसान होते़. यावरुन अनेकदा वादावादी होत असतात़. हा प्रकार टाळण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीने वाहने उचलली जाणार आहेत़. त्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने ई निविदा काढली होती़ नागपूरच्या विदर्भ इन्फोटेक या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे़. याबाबतचा करार लवकरच करण्यात येणार आहे़. त्यानंतर प्रत्यक्षात हायड्रोलिक पद्धतीने वाहने उचलणे सुरु होणार आहे़.
वाहतूक शाखेत मंगळवारी या यांत्रिक पद्धतीने वाहन उचलण्याचे प्रात्याक्षिक वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख व अन्य अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले़.
याबाबत विदर्भ इन्फोटेकचे सहायक प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत गंगाथडे यांनी सांगितले की, आमची अशाच पद्धतीने वाहने उचलणारी ८० वाहने सध्या मुंबईत कार्यरत आहेत़. पुणे शहरात दुचाकी वाहने उचलण्यासाठी ३५ क्रेन आणि चारचाकींसाठी १० क्रेन आणण्यात येणार आहे़.
या क्रेनवर चालक व दोन कर्मचारी असणार आहेत़. वाहतूक शाखेचा कर्मचारी सांगेल, त्या वाहनाला हे कर्मचारी हँडेल व मागील बाजूला पट्टा बांधतील व तो पट्टा हायड्रोलिक क्रेनच्या हुकाला लावून वाहन उचलले जाऊन क्रेनमध्ये ठेवण्यात येईल़. यामध्ये माणसांनी वाहन उचलताना, ते टेम्पोत चढविताना होणारे नुकसान टाळले जाणार आहे़. एक क्रेन एकावेळी ७ ते ८ वाहने उचलू शकते़.
सध्या वाहतूक शाखेकडे १० टेम्पोद्वारे वाहने उचलली जातात़. शहरातील वाहनांची संख्या व नियम मोडण्याचे प्रमाण पाहता ते खूप कमी आहे़. त्यामुळे अनेक वाहतूक विभागांना आठवड्यातून एखादा दिवस टेम्पो मिळतो़.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, मुंबईच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गृह विभागाच्या सूचनेनुसार यांत्रिक पद्धतीने वाहने उचलण्याची निविदा वर्षभरापूर्वी काढण्यात आली होती़. या कंपनीची निविदा मान्य करण्यात आली असून आवश्यक तो करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़.
़़़़़़़़़
सध्या वाहतूक शाखेच्या वतीने टेम्पोद्वारे उचलण्यात येणारा वाहनांना प्रत्येकी ५० रुपये टोईंग चार्जेस आकारण्यात येतात़.
़़़़़़़़़़़
यांत्रिक पद्धतीने उचलेल्या वाहनांवरील दंड (दुचाकीसाठी रुपये)
टोर्इंग चार्जेस २००
दंड २००
जीएसटी ३६
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एकूण ४३६ रुपये
़़़़़़़़़़़़
चार चाकींसाठी (रुपये)
टोर्इंग चार्जेस ४००
दंड २००
जीएसटी ७२
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
एकूण ६७२ रुपये
़़़़़़़़़़़़़
या क्रेनची वैशिष्टे
* वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता नाही
* वादावादीचे प्रसंग टळणार
* क्रेनवर दोन्ही बाजूला कॅमेरे बसविण्यात आले असल्याने वाहन उचलण्याचे संपूर्ण चित्रिकरण होणार
* कॅमेºयावर चित्रिकरण होणार असल्याने वाहने तशीच सोडून देण्याचे प्रकार थांबण्याची शक्यता़
* कॅशलेस व्यवस्था
* मात्र, या पद्धतीने चुकून जरी नो पार्किंगमध्ये वाहन उभे केले गेले तर वाहनचालकाला मोठा भुर्दंड बसणार