'आम्ही कात्रजचे भाई आहोत', पुण्यात भरदिवसा कात्रजच्या चौकात टोळक्याचा धुडगूस; वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:11 PM2022-04-08T12:11:51+5:302022-04-08T12:12:01+5:30

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघंविरोधात गुन्हा दाखल

Vehicles vandalized at Katraj Chowk in Pune | 'आम्ही कात्रजचे भाई आहोत', पुण्यात भरदिवसा कात्रजच्या चौकात टोळक्याचा धुडगूस; वाहनांची तोडफोड

'आम्ही कात्रजचे भाई आहोत', पुण्यात भरदिवसा कात्रजच्या चौकात टोळक्याचा धुडगूस; वाहनांची तोडफोड

googlenewsNext

पुणे : दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून एका ईरटीका कार ची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावरील आयसीआयसीआय बँकेसमोर हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्माईल मकानदार, तौशीफ उर्फ चुहा आणि त्यांचा आणखी एक साथीदार यांनी ही तोडफोड केली. कारचालक प्रवीण दिनकर गायकवाड यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सात एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा सर्व प्रकार घडलाय. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर फिर्यादी हे ईरटीका कार घेऊन प्रवासी वाहतूक करण्यासाठी नंबरला थांबले होते. यावेळी आरोपी हातात लाकडी बांबू घेऊन त्यांच्याजवळ आले. आम्ही कात्रजचे भाई आहोत. तुम्ही आमच्या परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक कशी करता. जर तुम्हाला कात्रज चौक ते मुंबई दरम्यान प्रवास वाहतूक करायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली. 

दरम्यान फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिला असता फिर्यादी व त्याचे मित्र यांना आरोपीने शिवीगाळ केली. हातातील लाकडी बांबूने ईरटीका कार ची तोडफोड करत 40 हजार रुपयांचे नुकसान केले आणि फिर्यादी ना ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींनी माजवलेल्या या दहशतीमुळे रोड वर उभे असलेले प्रवासी जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Vehicles vandalized at Katraj Chowk in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.