पुणे जिल्ह्यातील वेल्ह्याचे '' राजगड '' नामकरण करा : खासदार सुप्रिया सुळेंची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:50 PM2019-07-30T15:50:36+5:302019-07-30T16:20:49+5:30

अगदी शिवकालीन वाङ्मयात देखील तालुका राजगड असाच उल्लेख वेल्ह्याचा आढळतो..

velha name will change and doing Rajgad : The demand for MP Supriya Sule | पुणे जिल्ह्यातील वेल्ह्याचे '' राजगड '' नामकरण करा : खासदार सुप्रिया सुळेंची मागणी 

पुणे जिल्ह्यातील वेल्ह्याचे '' राजगड '' नामकरण करा : खासदार सुप्रिया सुळेंची मागणी 

Next

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून वेल्हा तालुक्याचा नावलौकिक आहे. अगदी शिवकालीन वाङ्मयात देखील तालुका राजगड असाच उल्लेख वेल्ह्याचा आढळतो. त्यामुळे पुण्यातील वेल्हयाचे 'राजगड' असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. या तालुक्यातील जनता देखील या नामकरणासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे राज्य सरकारने या मागणी संदर्भात त्वतरीत निर्णय घ्यावा अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

किल्ले राजगड हे सुध्दा वेल्हा तालुक्यात आहे.येथूनच शिवरायांनी दोन दशकांहून अधिक अधिक काळ स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात साकारले. इतिहास संशोधन मंडळाकडे देखील राजगड तालुका असाच संदर्भ आपल्याला वेल्हा तालुक्याचा सापडतो. त्यामुळे राज्य सरकारने वेल्हा तालुक्याच्या राजगड हे नामकरण करण्याच्या मागणीचा त्वरित विचाराधीन घेत तालुक्यातील जनतेच्या भावनांचा आदर करत सकारात्मक हा निर्णय घ्यावा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

Web Title: velha name will change and doing Rajgad : The demand for MP Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.