तोरणा गडावर रोपवे करण्याची वेल्हे ग्रामपंचायतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:11+5:302021-06-22T04:08:11+5:30
आमदार संग्राम थोपटे यांनी नुकतीच ग्रामपंचायतीला भेट दिली. याप्रसंगी वेल्हे ग्रामपंचायतीने किल्ले तोरणावर रोप वे करण्यासाठीची मागणी केली. तसेच ...
आमदार संग्राम थोपटे यांनी नुकतीच ग्रामपंचायतीला भेट दिली. याप्रसंगी वेल्हे ग्रामपंचायतीने किल्ले तोरणावर रोप वे करण्यासाठीची मागणी केली. तसेच तोरण्यावर विविध विकासकामे, पायाभूत सुविधा कराव्यात आणि तोरणा गडास पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करावे तर पैठणच्या धर्तीवर गार्डन व वॉटर पार्क गुंजवणी धरणाच्या खाली जलसंपदा विभागाच्या दीडशे एकर जागेत करावे, अशी मागणी या वेळी केली.
दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांनी वेल्हे ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सुसज्ज कार्यालयासाठी ५० लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सरपंच संदीप नगीने, उपसरपंच उज्ज्वला पवार, सदस्य पुष्पा भुरुक, सीता खुळे, सुनील कोळपे, निखिल गायकवाड, पप्पू सोनवणे, आरती गाडे, विजया भुरुक, ग्रामसेवक काशीद, माजी उपसभापती प्रकाश पवार, सुनील राजीवडे, संतोष मोरे, प्रमोद पवार, शोभा जाधव, डॉ. जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
२१ मार्गासनी
वेल्हे ग्रामपंचायत भेटीप्रसंगी आमदार संग्राम थोपटे व इतर.