वेल्हेकरांनी मांडला खासदारांपुढे समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:11+5:302021-06-16T04:15:11+5:30
मार्गासनी : खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्यात मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांचा पाढा नागरिकांनी सुळे ...
मार्गासनी : खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्यात मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांचा पाढा नागरिकांनी सुळे यांच्यासमोर वाचला.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते
यांची कानउघाडणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या कामासंदर्भात सूचना दिल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे येथील शिवगोरक्ष मंगल कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरवस्था, केळद खिंडमध्ये पडले रस्त्यावर पडलेले खड्डे तीन
वर्षे झाले बुजविले गेले नाहीत. याबाबतची तक्रार केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. तर चेलाडी वेल्हे रस्त्याच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्यापूर्वी गटारे काढणे
गरजेचे होते. अद्याप या रस्त्याच्या बाजूला कोणतेही गटार किंवा साईडपट्ट्या काढलेल्या नाहीत. सोंडे ते चिरमोडी रस्त्याची देखील दुरवस्था झाली असल्याची तक्रार सरपंच अशोक सरपाले यांनी केली. तर तालुक्यातील रेशनिंगचे अन्नधान्य सामान्य लाभार्थ्यास मिळत नसल्याची
तक्रार राघु भुरुक यांनी केली. तर महावितरणचे सडलेले खांब बदलणे, गावांमध्ये ट्रान्फार्मर बसविणे
आदी तक्रारी करण्यात आल्या. तर गुंजवणी धरणाचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावाला मिळाले पाहिजे, अशी मागणी खांबवडी गावातील युवक पिसे याने केली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक यांनी
आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी कार्यालयात बसून येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तीन महिन्यांत येथील नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, असेही या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, महावितरणचे समन्वयक प्रवीण शिंदे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता
शैलेश गिते, सहायक अभियंता संतोष शिंदे, विठ्ठल भरेकर उपस्थित होते.
फोटोसाठी ओळ - शिवगोरक्ष मंगल कार्यालय वेल्हे (ता. वेल्हे) खासदार सुप्रिया सुळे आढावा बैठकीत बोलताना.