वेगमर्यादा ३०; पण वाहने सुसाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:17 AM2017-11-09T05:17:26+5:302017-11-09T05:17:29+5:30
पुणे-सातारा रस्ता चव्हाणनगर कमानीजवळ शंकरमहाराज पूल सुरू होतो येथे सहकारनगरकडून येणारा रस्ता- स्वारगेटकडून येणारा रस्ता तसेच कात्रजकडून उड्डाणपुलावरून येणारा रस्ता येथे
सहकारनगर : पुणे-सातारा रस्ता चव्हाणनगर कमानीजवळ शंकरमहाराज पूल सुरू होतो येथे सहकारनगरकडून येणारा रस्ता- स्वारगेटकडून येणारा रस्ता तसेच कात्रजकडून उड्डाणपुलावरून येणारा रस्ता येथे जोडले जातात. तिन्ही बाजुने येणारी वाहने असल्याने हा चौक गजबजलेला असतो.येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक गुंतागूंत पाहण्यास मिळते.
जवळच अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती मंदिर, महावितरणचे आॅफिस, स्वामी विवेकानंदांचे स्मारक असा परिसर असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. धनकवडी, बालाजीनगर, पद्मावती, बिबवेवाडी येथील नागरिकांच्या वर्दळीचा परिसर असल्याने बाहेरून येणारी वाहने परस्पर कात्रजकडे जाण्यासाठी शंकरमहाराज उड्डाणपूल मोठ्या प्रमाणात वापरतात.
या भागात वेगमर्यादा ३० किलोमीटर असूनही उतारामुळे वाहने अतिशय सुसाट वेगाने येतात. त्यामुळे उताराकडे जो सिग्नल आहे त्याच्या अलीकडे आणखी स्पीडब्रेकर होणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
या भागात वसलेली जुनी गुरुराज सोसायटी यातील ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांच्या साठी रस्ता ओलांडणे म्हणजे मोठे दिव्यच पार पाडावे लागते. काही दिवसांपूर्वी येथील गुरुराज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडताना अपघातात जखमी झाले होतेया चौकात रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत काही महिन्यापूर्वी रात्री चारचाकी गाडी उलटी झाली. मात्र, या उपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. लहान बाळ बचावले गेले.
वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती व वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केल्यास येथे पादचारी मोकळा श्वास घेऊ शकतील. चौकात अनधिकृतपणे उभ्या राहणाºया ट्रॅव्हल कंपनीच्या बसकडेही वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.