राजगुरुनगरला व्हेंटिलेटर सेंटर, चाकण, आळंदी ऑक्सिजनबेड सेंटर सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:37+5:302021-04-08T04:11:37+5:30
खेड तालुक्यातील कोरोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने डॉ. कदम यांनी बुधवारी (दि. ७) चांडोली ग्रामीण रुग्णालयाला भेट ...
खेड तालुक्यातील कोरोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने डॉ. कदम यांनी बुधवारी (दि. ७) चांडोली ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सौम्य लक्षणे असलेले रुग्ण अधिक आहेत. त्या पद्धतीने उपचार सुरू करण्यात यावेत. साधारण लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या टेस्ट रिपोर्टची वाट न पाहता उपचार प्रारंभ केल्यास पुढील धावपळ करावी लागणार नाही. यासाठी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर राहावे. अशा सूचना यावेळी डॉ. कदम यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.तालुक्यात ४४ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.१४ हजार जणांच्या अँटिजेन टेस्ट केल्या आहेत. तालुक्यातील विविध ठिकाणी मिळुन ११२ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. यावर प्रशासन सतर्क आहे. चांडोली रुग्णालयात ७ व्हेंटिलेटर असून त्यातील तज्ञ नसल्याने हे सर्व युनिट आत्तापर्यंत बंद होते.सध्या रुग्णालयात कार्यरत व खासगी दवाखाने,रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण सुरू केले असुन ही सर्व युनिट आजपासून सुरू राहतील. प्रशिक्षित डॉक्टरांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील व्हेंटिलेटर येथेच एकत्र करुन कार्यान्वित केली जातील. असे डॉ कदम म्हणाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर ,चांडोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान कोकणे,प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण,पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यावेळी उपस्थित होते.