घरगुती कचऱ्यापासून गांडूळखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:28 AM2019-01-12T00:28:51+5:302019-01-12T00:29:15+5:30

मांदेडे ग्रामपंचायत व कर्वे समाजसेवा संस्थेचा संयुक्त उपक्रम

Vermicompost from domestic wastes | घरगुती कचऱ्यापासून गांडूळखत

घरगुती कचऱ्यापासून गांडूळखत

Next

पौड : रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयी ग्रामपंचायतीच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेल्या मुळशी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील मांदेडे ग्रापंचायतीने ‘ग्रामस्वच्छता’ या विषयातही एक पाऊल पुढे टाकले आहे. मांदेडे ग्रामपंचायत मुळशी तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.

या ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून तसेच कर्वे समाजसेवा संस्था व एस.एल.के. ग्लोबल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील प्रत्येक घरातील कचºयापासून खतनिर्मिती हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती सरपंच अरुणा वीर यांनी दिली.
या उपक्रमाकरिता ऋषी आगरवाल, दीप्ती कांबळे, चयन पारधी, गुरुनाथ स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाकरिता उपसरपंच संजय वीर, सदस्य बाळासाहेब साळुंखे, किसन बोडखे, अमृता वीर, पारूबाई कुडले, चंदाबाई धुमाळ यांचे सहकार्य लाभले.

मांदेडे गावात २0१७ पासून ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, महिला सबलीकरण त्याचबरोबर आता कचरा व्यवस्थापन या विषयातही काम सुरु केले आहे. चालू वर्षी प्रत्येक घरासमोर कचरा व्यवस्थापन यंत्रणा बसविली आहे. त्यामध्ये घरगुती कचºयाचे विघटन करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. कर्वे समाज सेवा संस्था व इनोरा बायोकेमिकल बावधन यांच्यामार्फत ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे कचरामुक्त गाव या संकल्पनेला गती चांगली गती मिळणार आहे.
- अरुणा वीर, सरपंच
 

Web Title: Vermicompost from domestic wastes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे