वेली तहसीलला कोरोनाचा विळखा, कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:19+5:302021-04-18T04:09:19+5:30

तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना कोरोना झाल्याने येथील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. येथील करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अनेकदा उपाययोजना ...

Vero tehsil to Corona's vilkha, atmosphere of fear in the working class | वेली तहसीलला कोरोनाचा विळखा, कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण

वेली तहसीलला कोरोनाचा विळखा, कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण

Next

तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना कोरोना झाल्याने येथील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. येथील करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अनेकदा उपाययोजना करूनही येथील संगणक चालक व खासगी सहायकांनाही कोरोनाने घेरले असल्याने तसेच अव्वल कारकून व महसूल सहायक विलगीकरणात असल्याने संपूर्ण तहसील कार्यालयाची जबाबदारी ३ अव्वल कारकून व २ महसूल सहायक यांचेवर आली आहे. यामुळे हवेली तहसील कार्यालयाचे प्रशासन कोरोनापुढे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे येथील दोन्ही तहसीलदार कोरोना संक्रमणातून बाहेर आल्याने त्यांनी कामकाजही सुरू केल्याने प्रशासकीय कामांना सुरुवात झाली आहे. मात्र अपु-या कर्मचारी संख्येमुळे त्यांचे कामावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.

हवेली तहसील कार्यालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) बंद ठेवला असून येथे विनाकारण फिरणा-यांना अटकाव केला आहे. कोरोना संक्रमणाच्या भितीमुळे याठिकाणी कर्मचारीही येण्यास तयार नाहीत मात्र वरिष्ठांच्या कार्यालयीन आदेशामुळे येथील कार्यविवरण मात्र कमी कर्मचा-यांच्या उपस्थितीत धिम्या गतीने सुरू आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी कोव्हिड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी येथील शिपाई व कर्मचा-यांना आठड्यातील दिवस विभागून देण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

विजयकुमार (चोबे, अप्पर तहसीलदार हवेली) :- कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांमध्ये कोविडबाधितांची संख्या वाढतच असल्याने या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरू आहेत. कार्यालय पूर्णपणे सॅनिटाईज केले आहे. बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचा-यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण अथवा औषधोपचार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Vero tehsil to Corona's vilkha, atmosphere of fear in the working class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.