पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये अतिशय कमी रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:18 AM2021-02-18T04:18:44+5:302021-02-18T04:18:44+5:30
येथील वैद्यकीय डॉक्टर म्हणाले की सध्या कॅन्टोन्मेंट भागात पॉझिटिव्ह रुग्ण अत्यंत कमी आहे. त्यामुळे बोर्डाचे सर्व विलगीकरण, कक्ष ...
येथील वैद्यकीय डॉक्टर म्हणाले की सध्या कॅन्टोन्मेंट भागात पॉझिटिव्ह रुग्ण अत्यंत कमी आहे. त्यामुळे बोर्डाचे सर्व विलगीकरण, कक्ष व सरदार पटेल रुग्णालयातील पॉझिटिव्ह वॉर्ड पूर्णपणे बंद आहे. आमच्या येथे दररोज १५ ते २० नागरिकच चाचण्या करून घेतात. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण दर वीस रुग्णांमगे एक किंवा दोन रुग्ण इतके असून अतिशय सौम्य, रुग्णांना आम्ही त्यांच्या इच्छेनुसार होम क्वारंटाइन होण्यासाठी मदत करतो. योग्य तो औषधोपचार करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करत असतो. वयोवृद्ध व मधुमेह,उच्च रक्तदाब व इतर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार करतो. सध्या त्यात केवळ सहा रुग्ण उपचार घेत असून त्यांची तब्येत व्यवस्थित आहे.