वेताळ टेकडीवर खाणी कोसळलेल्या तरुणाला वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:36+5:302021-01-04T04:10:36+5:30

पुणे : वेताळ टेकडीवर फिरायला गेलेला तरुण पाय घसरून खाणीत कोसळला. अग्निशामन दलाच्या जवानांनी त्याला जाळीच्या साहाय्याने बाहेर काढले. ...

Vetal rescues a young man who collapsed a mine on a hill | वेताळ टेकडीवर खाणी कोसळलेल्या तरुणाला वाचविले

वेताळ टेकडीवर खाणी कोसळलेल्या तरुणाला वाचविले

Next

पुणे : वेताळ टेकडीवर फिरायला गेलेला तरुण पाय घसरून खाणीत कोसळला. अग्निशामन दलाच्या जवानांनी त्याला जाळीच्या साहाय्याने बाहेर काढले. ही घटना रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.

तनिष्क विशाल लोढा (वय १६) असे या तरुणाचे नाव आहे. तनिष्क हा मित्रांबरोबर वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला गेला होता. खाणीच्या कडेला उभा असतानाचा त्याचा अचानक पाय घसरला व ताे खाणीत पडला. नागरिकांचा आरडाओरडा ऐकून वेताळ टेकडीवर ड्युटीवर असलेले फायरमन संजय भावेकर हे त्वरित खाणीत उतरले. दरम्यान, त्यांनी एरंडवणा अग्निशमन केंद्राकडे मदत मागितली. भावेकर यांनी त्या तरुणाला पाण्याच्या कडेला आणले. अग्निशमन दलाचे ऑफिसर राजेश जगताप, फायरमन सचिन आयवळे, सचिन वाघोले व इतर घटनास्थळी पोहचले. त्यांनी जाळीच्या साहाय्याने जखमी तरुणाला खाणीतून वर काढले व पुढील उपचारासाठी रुग्णावाहिकेतून रवाना केले.

Web Title: Vetal rescues a young man who collapsed a mine on a hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.