ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

By नम्रता फडणीस | Published: March 23, 2023 02:47 PM2023-03-23T14:47:05+5:302023-03-23T14:47:17+5:30

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे निश्चित केले

Veteran actor Dr. This year's Punya Bhushan Award was announced to Mohan Agashe | ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

googlenewsNext

पुणे: पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाच्या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे निश्चित केले आहे.
 त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.

जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्काराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. एक लाख रुपये रोख व सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याबरोबरच कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे.

Web Title: Veteran actor Dr. This year's Punya Bhushan Award was announced to Mohan Agashe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.