ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:59+5:302021-03-07T04:11:59+5:30
पुणे : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडविणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीकांत मोघे (वय ९१) यांचे ...
पुणे : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडविणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीकांत मोघे (वय ९१) यांचे शनिवारी (दि. ६) निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून जावई असा परिवार आहे. मोघे यांनी साठहून अधिक नाटके आणि पन्नासपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटविला. ’अशी पाखरे येती’, तुझे आहे तुजपाशी’,
लेकुरे उदंड झाली’, ’वाऱ्यावरची वरात’ अशी त्यांची अनेक नाटके गाजली. त्यातले वाऱ्यावरची वरात आणि ’साक्षीदार’ या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. ’उंच माझा झोका’ आणि ‘अवंतिका’ या मालिकांमध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, सांस्कृतिक पुरस्कार आदी विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. बेळगाव येथे २०१५ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ’नटरंगी रंगले’ हे यांचे आत्मचरित्रही गाजले आहे.
-------------------------------------------