ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन

By admin | Published: July 11, 2017 07:22 AM2017-07-11T07:22:43+5:302017-07-11T10:52:22+5:30

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले आहे.

Veteran cartoonist Mangesh Tendulkar died | ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी (10 जुलै) रात्री 10.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तेंडुलकर यांचे 90वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते. 

शेवटच्या दिवसांमध्येही त्यांचं व्यंगचित्र काढणं सुरूच होतं. 1954 मध्ये त्यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढलं होतं. तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे.  त्यांची स्वारी बुलेटवर बसून निघाली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटायचे. व्यंगचित्रांमधून पुण्यातील वाहतूक कोंडी व बेशिस्त यावर त्यांनी प्रहार केला. बोचऱ्या, मार्मिक पुणेरी भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांनी वाहतूक शाखेला मदतही केली.
 
मंगेश तेंडुलकर सांगायचे की व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा-मस्करीचे माध्यम नाही. त्यातून आदर, गौरव, काव्यात्मक आशयही व्यक्त करता येतो. त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. 
 
पुस्तके
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
 
पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी शासनाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार
 

Web Title: Veteran cartoonist Mangesh Tendulkar died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.