ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 09:54 AM2024-10-18T09:54:37+5:302024-10-18T09:57:23+5:30

ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असत. ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्राचीन ग्रंथ वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

veteran sanskrit scholar pandit vasant anant gadgil passed away in pune | ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ पंडित वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे: येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसंत अनंत गाडगीळ यांच वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा श्रीवर्धन गाडगीळ , सून आणि नातू असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

गाडगीळ हे झपाटलेले व्यक्तिमत्व होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास केला होता. पं. वसंत गाडगीळ यांनी प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमी निमित्त ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्याने विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार ते घडवून आणत. ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असत. ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्राचीन ग्रंथ वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता . संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शायदा संस्कृत नावाने ते मासिक चालवत होते .
 

Web Title: veteran sanskrit scholar pandit vasant anant gadgil passed away in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे