ज्येष्ठ गायक नारायणराव बोडस यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:40 AM2017-11-28T05:40:21+5:302017-11-28T05:40:29+5:30

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेते पं. नारायणराव बोडस यांचे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता दीर्र्घ आजाराने येथे निधन झाले.

 Veteran singer Narayanrao Bodas passes away | ज्येष्ठ गायक नारायणराव बोडस यांचे निधन

ज्येष्ठ गायक नारायणराव बोडस यांचे निधन

googlenewsNext

पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेते पं. नारायणराव बोडस यांचे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता दीर्र्घ आजाराने येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सविता आणि पुत्र केदार बोडस असा परिवार आहे.
विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाºया बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी
आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करत त्यांनी संगीतसाधना केली. गायक आणि
नट म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना
या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाºया दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी बोलक्या चेहºयाचा, भारदस्त आवाजाचा
आणि चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच ‘संगीत शारदम’ या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्याअनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या.
संगीत सौभद्रम, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद्र, सं. संशयकल्लोळ, सं. धाडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकांत अविस्मरणीय भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली.
नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र्रमध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. त्यांनी १२ वर्षे मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ पासून त्यांनी वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाºया विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.
 

Web Title:  Veteran singer Narayanrao Bodas passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे