Ambika Sarkar: ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

By श्रीकिशन काळे | Published: August 10, 2023 08:41 PM2023-08-10T20:41:34+5:302023-08-10T20:42:07+5:30

त्यांचा जन्म मुंबईत २९ जानेवारी १९३२ रोजी झाला होता...

Veteran writer Ambika Sarkar passed away at old age in Pune latest news in marathi | Ambika Sarkar: ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

Ambika Sarkar: ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ लेखिका अंबिका रमेशचंद्र सरकार (वय ९१) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. पतीचे आणि तीन अपत्यांचे निधन झाल्याचे दु:ख त्यांनी पचवले होते. त्यांच्या पश्चात नातू असून, ते परदेशात असतात. अंबिका सरकार यांचे माहेरचे नाव अंबिका नारायण भिडे असून, त्यांचा जन्म मुंबईत २९ जानेवारी १९३२ रोजी झाला होता.

गिरगावातील शारदासदनमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्या विल्सन महाविद्यालयातून बीए झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून १९५४ साली त्यांनी एमएची पदवी संपादन केली. १९५५ ते १९६०पर्यंत एल्फिन्स्टन महाविद्यालयात व नंतर १९९२ साली निवृत्त होईपर्यंत त्या सिडन्हॅम कॉलेज, मुंबई येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. समकालीन लेखिकांच्या कथालेखनाचा प्रभाव त्यांच्यावर होता. कमीत शब्दांत अधिक आशय, उत्कट भावभावना समर्थपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न अंबिका सरकार यांनी केला. ‘नकळत्या वयापासून १९५० पर्यंत माझे भरपूर वाचन झाले होते,’ असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या संस्कारी वाचनातून त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली. १९५२-१९५३मध्ये त्यांनी ७-८ कथा एका मागोमाग एक लिहिल्या. त्यांतील एका कथेला स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते.

त्यांच्या ‘चाहूल’ (१९८०) आणि ‘प्रतीक्षा’ (१९८१) हे दोन कथासंग्रह; ‘एका श्वासाचं अंतर’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्यांचे लिखाण मोजकेच असले तरी आशयपूर्ण आहे. त्यांच्या कथा ‘सत्यकथा’, ‘दीपावली’, ‘हंस’ यांसारख्या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. थिऑसफी आणि बौद्धधर्म हे त्यांच्या आवडीचे विषय होते. भिक्खू संघ रक्षित यांच्या ‘हिस्टरी ऑफ माय गोइंग फॉर रेफ्यूज’ या पुस्तकाचा ‘माझ्या शरण गमनाचा इतिहास’ आणि ‘द बोधिसत्त्व आयडिअल’ या पुस्तकाचा ‘बोधिसत्त्व आदर्श’ हा अनुवाद त्यांनी केला होता.  

Web Title: Veteran writer Ambika Sarkar passed away at old age in Pune latest news in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.