पशुवैद्यकांच्या काम बंद आंदोलनाचा दुग्धव्यवसयाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:47+5:302021-07-31T04:11:47+5:30
---------- निरगुडसर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील खासगी पदविकाधारक पशुवैद्यक २२ जुलै पासून काम बंद आंदोलन करीत ...
----------
निरगुडसर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील खासगी पदविकाधारक पशुवैद्यक २२ जुलै पासून काम बंद आंदोलन करीत आहेत त्याआधारे आंबेगाव तालुक्यात पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यवसायिकांचे असहकार आंदोलन चालू आहे. यामुळे जनावरांना पशुवैद्यकांच्या सेवा मिळणे कठीण झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. आंदोलनाचा थेट परिणामी दुग्ध व्यवसायाला बसला असून उपचारा अभावी जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे,.
एकीकडे हे आंदोलन सुरु सताना दुसरीकडे पदविकाधारक पशुवैद्यकांचा कामाचा ताण वाढलानअसताना दुसरीकडे वर्षानुवर्षांपासून शासनाने पशु विभागातील रिक्त पदांची भरती करण्याकडे डोळेझाक केली आहे आहे. त्यामुळे पशुपालकांना सेवा देताना यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.
आंबेगाव तालुक्यात शंभर ते दीडशे पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे पदविकाधारक आहेत. तालुक्यातील सरकारी दवाखान्यात पशुवैद्यक यांचे अनेक वर्षापासून काही ठिकाणी पदविकाधारक यांचे पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षक यांचे गेल्या दहा वर्षात नवीन एकही पद भरण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी पशुवैद्यक यांवर अवलंबून राहावे लागते आणि त्याच पदविकाधारक सध्या संपावर गेले आहेत. त्यांना सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे अगर त्यांच्या व्यावसायिक नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कायदा निर्माण करावा असे आव्हान आंबेगाव तालुका पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे अध्यक्ष डॉ संजय भोर यांनी केले आहे.
यावेळी डॉ शांताराम गावडे, डॉ निवृत्ती पोखरकर ,डॉ निवृत्ती मेहत्रे, डॉ सुरेश टाव्हरे, डॉ सचिन खिलारी, डॉ धनंजय करंडे, डॉ प्रवीण भालेराव, डॉ संभाजी इंदोरे ,डॉ अशोक भोर, डॉ गव्हाणे, डॉ बाळशिराम निघोट, डॉ संभाजी इंदोरे हे उपस्थित होते.
-----
आंदोलन सुरू करण्यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना आम्ही निवेदन दिले होते. दोन दिवसांन पुर्वी मुंबई येथे मंत्रालयात त्यांची भेट घेतली असता ते या विषयात लक्ष घालणार असून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
-
डॉ, संजय भोर, अध्यक्ष, दुग्धव्यवस्थापन सेवा संघ
--
धामणी येथील पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दवाखाना सतत बंद राहत आहे.परिनामी येथील पशुपालकांचे अतोनात हाल होत असून या ठिकाणी काम करणारे पशुवैद्यकिय अधिकारी हे चाकण या ठिकाणी मुक्कामी असतात त्यांच्या पश्चात येथे असलेले शिपाई हेच पशुंवर उपचार करत आहेत त्यामुळे येथील पशुधन धोक्यात आले आहे.