टंचाईने घेतला आणखी एका चिंकाराचा बळी
By admin | Published: March 28, 2016 03:15 AM2016-03-28T03:15:26+5:302016-03-28T04:05:32+5:30
भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा हरणाचा मृत्यू झाल्याची घटना बारामती-मोरगाव मार्गावर घडली. रविवारी (दि. २७) काऱ्हाटी पाटीनजीक दुपारी एकच्या दरम्यान
सुपे : भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने चिंकारा हरणाचा मृत्यू झाल्याची घटना बारामती-मोरगाव मार्गावर घडली. रविवारी (दि. २७) काऱ्हाटी पाटीनजीक दुपारी एकच्या दरम्यान हा अपघात झाला. पाण्याच्या शोधात भटकंती करताना या हरणाचा अपघातात बळी गेला आहे. हा तिसरा बळी आहे. पाण्याच्या शोधार्थ असलेल्या हरणांचे अपघाताचे प्रकार उन्हाळ्यात कायम होतात.
काऱ्हाटी पाटीवरील शुभम ढाब्यानजीक अज्ञात वाहनाने चिंकारा हरणाला धडक दिली. या अपघातात हरणाच्या तोंडाला जबर मार लागला. तोंडाला मार लागल्याने हरणाचा एक डोळा निकामी झाला होता, अशी माहिती प्रादेशिक वनविभागाचे मोरगाव येथील वनरक्षक महेश जाधव यांनी दिली.
लोणी भापकर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांनी चिंकाराचे शवविच्छेदन केले. यामध्ये त्याच्या तोंडाला वाहनाचा मार लागल्याने एक डोळा निकामी झाल्याचे जाधव यांनी सांगितले.
मादी जातीचे चिंकारा हरिण आठ ते नऊ महिन्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)