व्हिक्टोरिया तलाव गाळात

By Admin | Published: April 22, 2016 01:11 AM2016-04-22T01:11:00+5:302016-04-22T01:11:00+5:30

दौंड व बारामती तालुक्यांतील काही गावांची तहान भागविण्याचे काम वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव करीत असून, या तलावाच्या निर्मितीपासून आजतागायत या तलावातील गाळ काढण्यात आलेला नाही.

Victorian lake tragedy | व्हिक्टोरिया तलाव गाळात

व्हिक्टोरिया तलाव गाळात

googlenewsNext

वरवंड : दौंड व बारामती तालुक्यांतील काही गावांची तहान भागविण्याचे काम वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव करीत असून, या तलावाच्या निर्मितीपासून आजतागायत या तलावातील गाळ काढण्यात आलेला नाही.
तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्यामुळे, या तलावाची पाणी साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावासाठी गेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. तलाव जरी जवळ असला, तरी या मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे पाणी पाझर होत नाही. यामुळे या तलावाचा वरवंडकरांना साधा पाझराचा पण फायदा नाही. वरवंडला तर या तलावातील पाणी मिळत नाही.
व्हिक्टोरिया तलाव हा १८७६ साली करण्यात आला आहे. हा तलाव जवळपास ३१० एकरा मध्ये असून, या तलावाची साठवण क्षमता २०० दशलक्ष घनफुट आहे. तसेच पाटबंधारे(जलसंपदा) विभाग हा या तलावातून कुरकुंभ एमआयडीसी, जानाई-शिरसाई योजना, वायनरी प्रकल्प यांना पाणी देण्यात येते. हा तलाव खडकवासला फाट्याद्वारे भरला जातो व हा तलाव भरल्या नंतर पुढे गरजेनुसार पाणी पुरवले जाते.

Web Title: Victorian lake tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.