सेंट्रल झोन, डेक्कन जिमखाना, पीवायसी यांचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:13+5:302021-03-21T04:11:13+5:30
पुणे : केडन्स चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल झोन, डेक्कन जिमखाना, पीवायसी यांनी शानदार विजय मिळवले. सेंट्रल झोनने साऊथ ...
पुणे : केडन्स चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल झोन, डेक्कन जिमखाना, पीवायसी यांनी शानदार विजय मिळवले.
सेंट्रल झोनने साऊथ झोनवर सहा धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल झोनने ४९.५ षटकांत सर्वबाद २४९ धावा केल्या. साऊथ झोनचा डाव ४८.३ षटकांत २४३ धावांवर संपुष्टात आला. सेंट्रल झोनकडून ओंकार येवले (५७), अशिकम काझी (३४) यांनी सर्वाधिक धावा केल्या. साऊथ झोनकडून गिरीश बोचरे (४-५४) आणि आदिनाथ (३-२६) यांनी प्रभावी मारा केला. साऊथ झोनकडून अभिषेक पवार (७०), ओंकार यादव (७३) यांनी झुंज दिली. सेंट्रलकडून किरण चोरमलेने ४६ धावांत चार गडी बाद करत सामनावीर किताब मिळवला.
दुसºया सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने ५० षटकांत पाच बाद ३४३ धावा केल्या. ईस्ट झोनचा डाव ४३.४ षटकांत २०९ धावांवर संपुष्टात आला. डेक्कन जिमखानाकडून यश बोरामणी याने १०४ चेंडूंत ११० धावा केल्या. अथर्व वणवे याने ५५ चेंडूंत नाबाद ९२ धावा केल्याने डेक्कनला ३४३ पर्यंत मजल मारता आली. ईस्ट झोनकडून उबेद खान (५०), सौरभ शिंदे (४२) यांनी झुंज दिली. डेक्कनकडून आदर्श नागोजी (३-१४), अजयू बोरुडे (२-१२) यांनी प्रभावी मारा केला. यश बोरामणी सामनावीर ठरला.
पीवायसीने एके क्लबवर १७ धावांनी विजय मिळवला. पीवायसीने ४८.४ षटकांत सर्वबाद २२२ धावा केल्या. एके क्लबचा डाव ४९.१ षटकांत २०५ धावांवर संपुष्टात आला. पीवायसीकडून सोहम शिंदे (५०), मिहीर देशमुख (४१) यांनी संघाचा डाव सावरला. एके क्लबकडून प्रतीक कदमने पाच तर रामेश्वर याने दोन गडी बाद केले. एके क्लबकडून प्रतीक कदम (४४), अभिनंदन गायकवाड (४२) यांनी झुंज दिली. पीवायसीकडून वैभव तेहाले याने चार तर सोहम शिंदे व अब्दुस सलाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सोमह शिंदे सामनावीर ठरला.
युनायटेड, वेस्ट झोन, केडन्सची आगेकूच
युनायटेड संघाने नॉर्थ झोवर पाच गडी राखून विजय मिळवला. नॉर्थ झोनने ४८.२ षटकांत सर्वबाद १३९ धावा केल्या. युनायडेटने ३३ षटकांत पाच बाद १४३ धावा करून विजय मिळवला. वेस्ट झोनने ब्रिलियंट क्लबवर १२६ धावांनी विजय मिळवला. तर केडन्सने पूना क्लबवर आठ गडी राखून मात केली.