छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने किल्ले रोहिडेश्वर, रायरेश्वर गड दुमदुमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:54+5:302021-02-21T04:17:54+5:30
भोर शहरासह परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. भोर नगरपालिकेच्या ...
भोर शहरासह परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. भोर नगरपालिकेच्या वतीने एसटी स्टँड जवळ मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात, नगराध्यक्षा निर्मला आवारे यांसह सर्व नगरसेवक शिवप्रेमींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडावर भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. भोर महसूल विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मानकरवाडी येथे शिवप्रेमींचे व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ,उपसरपंच , सदस्य, तरुण मंडळ ,महिला यांनी मशाल घेऊन शिवाजी महाराजांचा जय घोष करण्यात आला.
२०भोर किल्ला
रायरेश्वर गडावर शिवजयंतीनिमित्त अभिषेक करताना भोर
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे.