व्हेरॉक, सेंट्रल झोन, केडन्स अकादमी यांचे विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:22+5:302021-03-20T04:10:22+5:30
पुणे : केडन्स चषक १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक, सेंट्रल झोन, केडन्स अकादमी यांनी शानदार विजय मिळवले. व्हेरॉक ...
पुणे : केडन्स चषक १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक, सेंट्रल झोन, केडन्स अकादमी यांनी शानदार विजय मिळवले.
व्हेरॉक अकादमीने साऊथ झोन संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. साऊथ झोन संघाने प्रथम फलंदाजी करताना ४६.४ षटकांत सर्व बाद २५४ धावा केल्या. व्हेरॉक अकादमीने ४२.५ षटकांत पाच बाद २५८ धावा करून विजय साकारला. साऊथ झोनकडून अभिषेक पवार (८३), ओंकार यादव (३७) यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर व्हेरॉककडून ओंकार राजपूतने चार तर हर्षवर्धन पवार याने तीन गडी बाद केले. व्हेरॉककडून सूरज गोंड याने ८१ चेंडूंत ९६ धावा केल्या. तर अंश धूत याने नाबाद ६४ धावा केल्या. साऊथ झोनकडून प्रतीक चित्रे याने दोन गडी बाद केले.
सेंट्रल झोन संघाने अॅम्बिशिअस अकादमीवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अॅम्बिशिअस अकादमीचा डाव ४५ षटकांत १६७ धावांवर संपुष्टात आला. सेंट्रल झोनने ३०.३ षटकांत दोन बाद १७१ धावा करत विजय साकारला. अॅम्बिशिअसकडून मोहित नेगी याने सर्वाधिक ७० धावा केल्या. सेंट्रल झोनकडून सचिन धस याने २७ धावांत पाच गडी बाद केले. सेंट्रल झोनकडून ओंकार येवले याने नाबाद ७९ धावा करून विजय साकारला.
केडन्स अकादमीने ब्रिलियंट अकादमीवर १९६ धावांनी शानदार विजय मिळवला. केडन्स अकादमीने ५० षटकांत नऊ बाद ३०८ धावा केल्या. ब्रिलियंट अकादमीला २३.२ षटकांत ११२ धावांवर रोखून केडन्स अकादमीने विजय साकारला. केडन्सकडून दिग्विजय पाटील याने ९८ चेंडूंत १०४ धावा केल्या. आर्यन गोजे याने ५० धावा केल्या. ब्रिलियंट अकादमीकडून प्रथमेश भोपाले याने २४ धावा करत एकाकी झुंज दिली. केडन्सकडून शुभम खरात याने २५ धावांत पाच गडी बाद केले.
ईस्ट झोन, २२ यार्ड्स, नॉर्थ झोन विजयी
अन्य लढतींमध्ये ईस्ट झोन संघाने कॉम अकादमीवर चार गडी राखून विजय मिळवला. २२ यार्ड्स संघाने डेक्कन जिमखाना संघावर २२ धावांनी विजय मिळवला. २२ यार्ड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकांत सर्वबाद २७९ धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाला ४९.१ षटकांत सर्वबाद २५७ धावा करता आल्या. नॉर्थ झोनने पीवायसी संघावर १५ धावांनी विजय मिळवला. एके अकादमीने युनायटेड संघावर तीन गडी राखून विजय मिळवला. वेस्ट झोनने पूना क्लबवर १५९ धावांनी विजय मिळवला.
-----------------------------------------------------