प्रज्ञेश, दक्ष, क्रिशांक, शार्दूल यांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:42+5:302021-03-07T04:10:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल बारा वर्षाखालील सब-ज्युनियर ...

Victory of Pragnesh, Daksha, Krishank, Shardul | प्रज्ञेश, दक्ष, क्रिशांक, शार्दूल यांचे विजय

प्रज्ञेश, दक्ष, क्रिशांक, शार्दूल यांचे विजय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल बारा वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रज्ञेश शेळके, दक्ष पाटील, क्रिशांक जोशी, शार्दूल खवळे, जय गायकवाड या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पात्रता फेरीच्या अंतिम गटात प्रवेश केला.

जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या प्रज्ञेश शेळकेने आपलाच राज्य सहकारी विमल धैर्यचा टायब्रेकमध्ये ९-८ (४) असा पराभव केला. महाराष्ट्राच्या दक्ष पाटीलने कर्नाटकाच्या अर्श वाळकेचा ९-१ असा सहज पराभव केला. क्रिशांक जोशी याने अनुराग पाटीलला ९-० असे नमविले. महाराष्ट्राच्या शार्दूल खवळे याने कर्नाटकाच्या प्रणित पॉलचा ९-१ असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

दुसरी पात्रता फेरी : मुले :

प्रज्ञेश शेळके (महाराष्ट्र) वि.वि. विमल धैर्य (महाराष्ट्र) ९-८ (४);

ईशान बदागी (कर्नाटक) वि.वि. मनन राय (महाराष्ट्र) ९-४;

शार्दूल खवळे (महाराष्ट्र) वि.वि. प्रणित पॉल (कर्नाटक) ९-१;

विहान जैन (हरियाणा) वि.वि. अवी मिश्रा ९-१;

दक्ष पाटील (महाराष्ट्र) वि.वि. अर्श वाळके (कर्नाटक) ९-१;

क्रिशांक जोशी (महाराष्ट्र) वि.वि. अनुराग पाटील (महाराष्ट्र) ९-०;

जय गायकवाड (महाराष्ट्र) वि.वि. ऋषभ मोदी(महाराष्ट्र) ९-५;

मुली : पहिली पात्रता फेरी

रितिका दावलकर वि.वि. अनन्या यादव (महाराष्ट्र) ९-२;

अनन्या भुतडा (महाराष्ट्र) वि.वि. ऐश्वर्या स्वामीनाथन (महाराष्ट्र) ९-२;

यशिता इरिती (तेलंगणा) वि.वि. क्रितीयानी घाटकर ९-६;

सौम्या तमंग (महाराष्ट्र) वि.वि. सहस्रा रेड्डी (तेलंगणा) ९-३;

Web Title: Victory of Pragnesh, Daksha, Krishank, Shardul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.