वीरेन, आर्यन, राघव, वेद यांचे विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:26+5:302021-03-23T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने बारा वर्षाखालील मुले व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने बारा वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत वीरेन चौधरी, आर्यन किर्तने, राघव सरोदे, वेद मोघे यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र मंडळ टेनिस कोर्ट मुकुंदनगर या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात वीरेन चौधरीने तिसऱ्या मानांकित शौनक रणपिसेचा एकतर्फी पराभव केला. बिगरमानांकित आर्यन किर्तने याने सहाव्या मानांकित क्षितिज अमीनवर विजय मिळवला. राघव सरोदे व वेद मोघे यांनी अनुक्रमे चौथ्या मानांकित सक्षम भन्साळी व आठव्या मानांकित सनत कडलेचा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : दुसरी फेरी : मुले :
समीहन देशमुख (१) वि.वि. आरुष पोतदार ६-०,
रोहन बजाज वि.वि. पुरंजय कुतवळ ६-०,
अर्जुन परदेशी (७) वि.वि. युगंधर शास्त्री ६-०,
वीरेन चौधरी वि.वि. शौनक रणपिसे (३) ६-१,
नमिश हूड (५) वि.वि. सिद्धांत दर्डा ६-०,
आर्यन किर्तने वि.वि. क्षितिज अमीन (६) ६-०,
राघव सरोदे वि.वि. सक्षम भन्साळी (४) ६-४,
वेद मोघे वि.वि. सनत कडले (८) ६-४.