Video : वहिनी स्वत:ला आवरा, रुपाली ठोंबरेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:41 AM2022-02-02T09:41:28+5:302022-02-02T15:07:51+5:30

अमृता फडणवीस यांनी खोचक ट्विट करत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर हल्लाबोल केला होता. नाना पटोले, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता

Video : Amrita Fadnavis's mimicry from Rupali Thombare after critics on mahavikas aghadi | Video : वहिनी स्वत:ला आवरा, रुपाली ठोंबरेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री

Video : वहिनी स्वत:ला आवरा, रुपाली ठोंबरेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री

googlenewsNext

पुणे - काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. नाना पटोले यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचाही समावेश होता. अमृता फडणवीस यांनी ‘नन्हे पटोले’ म्हणत ट्विटरवरून टीका केली होती. त्यावरुन, अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पटलवार केला आहे.

अमृता फडणवीस यांनी खोचक ट्विट करत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर हल्लाबोल केला होता. नाना पटोले, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन, आता रुपाली ठोंबरे यांनी अमृता फडणवीसांना आवरा, अशी साद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे. तसेच, आपली नावडती बहिणी म्हणून माझं ऐका असेही रुपाली पाटील यांनी म्हटलंय. 

आमच्या माजी मिसेस मुख्यमंत्री वहिनीसाहेबांबद्दल काय सांगायचं?. आमचे विरोधी पक्षभाऊ वहिनींना अडवतच नाहीत, या गोष्टीचं दु:ख होतंय. कारण, अमृता फडणवीसांनी पदाची गरिमा धुळीला मिसळली आहे, त्या म्हणतात नॉटी नामर्द, बिघडे नवाब, नन्हे पटोले... यासंह त्यांच्या विधानाचे रुपाली पाटील यांनी वाचन केले. तसेच, आपण कोणत्या पक्षाच्या आहात हे स्पष्ट करा, आपण मागे बोलला होतात. माझा पक्षाशी काहीही संबंध नाही, मी एक समाजसेविका आहे, मग तुमची ही भाषा समाजाला कशी चालेल? असे म्हणत रुपाली ठोंबरेंनी अमृता फडणवीस यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. 

महाविकास आघाडी सरकार चुकत असेल तर टीका आणि चर्चा करा. पण, भाऊराया वहिनीसाहेब अत्यंत अंधाधुंद वागत आहेत, माजी मिसेस मुख्यमंत्र्यांची प्रतिमा त्यांनी धुळीला मिळवलीय. शेतकऱ्यांना साले म्हणणारे कोण आहेत, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारे कोण आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांची खाती एका बँकेतून दुसऱ्या बँकेत वळविणारे कोण आहेत? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. 

अमृता फडणवीसांचे काय होतं खोचक ट्विट

अमृता फडणवीसांनी ट्विटवरती नाना पटोले यांना नन्हे पटोले असा उल्लेख करत, काही प्रश्न विचारले. ५०-५० मार्कांचे हे दोन प्रश्न अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांबद्दलचे होते. “थोडक्यात उत्तर द्यावे… ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है नामर्द है !”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. 
 

Web Title: Video : Amrita Fadnavis's mimicry from Rupali Thombare after critics on mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.