Video : भवानी पेठेत प्लॉस्टिकच्या कारखान्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 08:14 PM2018-11-08T20:14:15+5:302018-11-08T20:14:30+5:30
भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे़. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मिळाली़ मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन अग्निशामक दलाने तातडीने १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले होते.
पुणे - भवानी पेठेतील प्लॉस्टिकच्या कारखान्याला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. कारखान्यात रबर आणि प्लॉस्टिकचे साहित्य असल्याने आगीने वेगाने अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्याच्या ज्वाळा लांबवरुन दिसून येत असल्याने या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले़
भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे़. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मिळाली़ मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन अग्निशामक दलाने तातडीने १० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोचले होते. अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्याने ही आग दीड तासाच्या प्रयत्नांनंतर विझविण्यात यश मिळविले. या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही़. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीच्या ज्वाळा लांबवरुन दिसत होत्या़. आग आपल्या घरापर्यंत येईल, या भीतीने जवळ राहणाऱ्या नागरिकांची आपल्या घरातील हाताला लागेल ते साहित्य बाहेर काढून लांबवर ठेवण्यासाठी एकच धावपळ सुरु होती़.