VIDEO: प्रशासक काळात पालिकेत मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांवर गुन्हा दाखल करा- रविंद्र धंगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 02:23 PM2024-03-14T14:23:40+5:302024-03-14T14:27:44+5:30
महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धंगेकरांनी केली....
पुणे : पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत भ्रष्टाचार होत आहे, असं धंगेकर म्हणाले. आज त्यांनी महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर फुटपाथवर बसून आंदोलन केले. तसेच महापालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
आमदार धंगेकर म्हणाले, मागील २ वर्षापासून महापालिकेत प्रशासक राज्य आहे. पालिकेचे आयुक्त हे भाजपचे असल्यासारखे वागत आहेत. प्रशासककाळात अ, ब, क, ड पद्धतीनुसार निधी दिला जात आहे. आज ३ वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झाला तरी महापालिका आयुक्त अजूनही इथेच आहेत
महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धंगेकरांनी केली.