आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ महिन्यानंतर उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:32+5:302021-09-15T04:14:32+5:30
रश्मी रोहित पवार व तिची आई लता राजेश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस ...
रश्मी रोहित पवार व तिची आई लता राजेश चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित याचा विवाह २० नोव्हेंबर २०१६ मध्ये रश्मी हिचेशी झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी दोघांत कौटुंबिक कारणाने वाद होत होते. त्यामुळे रोहित व रश्मी वेगळे घर करून राहायला लागले होते. सासू सासऱ्यापासून विभक्त झाल्यानंतरही त्यांच्यात सातत्याने भांडणे होतच होती. अनेकदा रश्मीने रोहितला घर सोडून जाईन व स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून रोहित त्याच्या कुटुंबीयांना गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी दिली होती. ७ ऑगस्ट रोजी तिचे रोहितशी जॉब करण्यावरून भांडण झाले होते. मात्र रोहितने त्यास घरात बाळाकडे लक्ष दे असे सांगितल्यावर ती पुन्हा माहेरी निघून गेली होती. १० ऑगस्ट रोजी रोहितच्या आई-वडिलांनी रोहितला फोन केला मात्र रोहितने फोन उचलला नाही. रोहितचा संपर्क होत नसल्याने चुलते श्यामराव पवार हे रोहितच्या खोलीवर गेले तेव्हा आतून दरवाजा बंद असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानी दुसऱ्या चावीने रोहितची खोली उघडल्यावर रोहितने ओढणीने गळफास घेतल्याचे उघड झाले. पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद केली व रोहितचा मोबाईल ताब्यात घेतला होता. दरम्यान रोहितच्या वडीलांनी रश्मी व तिच्या आईविरुध्द फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी रश्मी आणि लता चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.