VIDEO - शिक्षणासाठी 'त्यांना' रोज पार करावी लागते नदी
By admin | Published: October 14, 2016 08:06 PM2016-10-14T20:06:13+5:302016-10-14T20:22:57+5:30
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणगावचे विद्यार्थी शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून रोजच जीवघेणा प्रवास करत आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
डेहणे, दि. १४ - एकीकडे डिजीटल शिक्षणासाठी प्रसार, प्रचार जोरात चालू आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांसाठी पायाभूत सुविधा मिळणे, समस्या सुटण्यास मुहूर्त लागत नाही. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. तरीही या आदिवासी समाजाचे प्रश्न प्रलंबीतच आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणगावचे विद्यार्थी शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून रोजच जीवघेणा प्रवास करत आहेत.
मागील १५ वर्षांपासून ग्रामस्थ साकव पुलाची मागणी करत आहे. मात्र अद्यापही त्यांच्या या मागणीला राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. हे विद्यार्थी धामणगावहून शिक्षणासाठी डेहणे (ता. खेड) येथील महाविद्यालयात अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करून येतात. भीमा नदीच्या पलिकडे असणा-या गावांना धरणाचे विस्तीर्ण पाञ होडीनेच पार करावे लागत आहे. कायम धरणात पाणी असल्याने फक्त उन्हाळ्यात एखादा महिना सोडल्यास बाकी हा जीवघेणा प्रवास आता रोजचा झाला आहे.
एकलहरे, धामणगावचे ग्रामस्थ या चासकमान धरणामुळे विस्थापिताचे जीवन जगत आहेत. दळणवळणासाठी पलीकडे जाण्याचा जवळचा मार्ग नसल्याने ग्रामस्थ डेहणे येथे जाण्यासाठी होडीचा वापर करतात.
फुटलेल्या होड्यांमधून धोकादायक वाहतूक
जिल्हा परिषदेच्या ह्या होड्याही खूप जुन्या झालेल्या आहेत. पावसाळ्यात या होड्यामंध्ये पाणी साठते. पर्यायी व्यवस्था नसल्याने ह्याच फुटलेल्या होड्यांमधून विद्यार्र्थी प्रवास करतात. होडी चालवण्याचा लिलाव कोणालाही दिला नसल्याने महिला, मुले ही होडी चालवतात. सव्वाशे मीटरपेक्षा जास्त रुंद पाञ असल्याने चालवणाराची दमछाक होते. त्यामुळे लिलाव घेण्यासाठी कोणी तयार होत नाही.
पालक सतत चिंतेत
धामणगावच्या होडीत सकाळी शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची गर्दी होते. चालवणारा नसेल तर ही मुलेच होडी पैलतीरी नेतात. गेल्या वीस वर्षांपासून जीव धोक्यात घालून प्रवास चालू आहे. शाळेतून मुले घरी परत येईपर्यत पालक चिंतेत असतात.