पीडित मुलीवरील अत्याचाराचे केले होते व्हिडिओ चित्रीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:27+5:302021-09-17T04:16:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन पीडित मुलीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याचे आरोपी आणि पीडित मुलीने सांगितले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन पीडित मुलीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याचे आरोपी आणि पीडित मुलीने सांगितले असून, तब्बल ९ ठिकाणी नेऊन आरोपींनी मुलीवर अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींंना या गुन्ह्यात अजून कुणी मदत केली आहे का? अल्पवयीन मुलींना समज नसल्याचा फायदा घेऊन आणखी कोणत्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी १७ आरोपींना एस. पी. पोंक्षे कोर्टाने आणखी चार दिवसांची, तर अजून दोन आरोपींना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय २७ रिक्षाचालक, वैदूवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय ३२), रफिक मुतर्जा शेख (३२), अझरूद्दीन इस्लमामुद्दीन अन्सारी, प्रशांत सॅमिअल गायकवाड (३२), राजकुमार रामनगिना प्रसाद (२९), नोईब नईम खान (२४), असिफ फिरोज पठाण (३६), मिराअली उर्फ मिरा अजीज शेख (२६), शाहजुर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (२८), समीर मेहबूब शेख (१९), फिरोज उर्फ शाहरूख साहेबलाल शेख (२२), महबूब उर्फ गौस सत्तार शेख (२३) आणि मोहम्मद उर्फ गोलू मोज्जाम आलम (१९) अशी पोलीस कोठडी दिलेल्या आरोपींची नावे आहेत. काही जणांची नावे समजू शकली नाहीत. या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर मेहबूब बादशाह शेख (२७) आणि इस्माईल लतीफ शेख (३६) या दोघांना बुधवारी (१५) अटक करण्यात आली. न्यायालयात आणले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तेरा आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांत लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमाप्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यांचा अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार १७ आरोपींना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
------------------------------------------------