व्हिडीओ : पुणेकरांची माणुसकी ; हजाराे लाेकांच्या गर्दीतून रुग्णवाहिकेला दिली वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 07:18 PM2019-09-13T19:18:11+5:302019-09-13T19:20:48+5:30
विसर्जन मिरवणुकीत आलेल्या रुग्णवाहिकेला क्षणार्धात वाट माेकळी करुन देत पुणेकरांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
पुणे : जिथे नजर जाईल तिकडे नागरिक उभे हाेते. संपूर्ण अलका चाैक गणेशभक्तांनी फुलून गेला हाेता. एका ढाेल ताशा पथकाचे जाेशात वादन सुरु हाेते. आणि इतक्यात सायरन चा आवाज येताे अन क्षणार्धात हजाराे पुणेकर मागे सरकत रुग्णवाहिकेला वाट माेकळी करुन देतात. रुग्णवाहिका काही सेकंदात चाैकातून निघून गेल्यानंतर गणपती बाप्पा माेरयाचा जाेरदार जयघाेष हाेताे.
पुण्यातील अलका चाैकामध्ये शहरातील सर्व गणेश मंडळे येत असतात. प्रत्येक मंडळ आपलं सादरीकरण या चाैकामध्ये येऊन करत असतं. त्यामुळे पुणेकरांबराेबरच देशभरातून नागरिक या चाैकामध्ये मिरवणुक पाहण्यासाठी गर्दी करत असतात. काल संध्याकाळी एका मंडळासमाेर एका ढाेल ताशा पथकाचे वादन सुरु हाेते. वादन जाेशात सुरु असताना अचानक सायरनचा आवाज झाला. महापालिकेच्या स्वागत मंडपामधून रुग्णवाहिकेला वाट करुन देण्याचे आवाहन करण्यात आले. ढाेला ताशा पथकाने आपले वादन थांबवले. अन् क्षणार्धात हजाराे पुणेकरांनी मागे सरकत रुग्णवाहिकेला वाट करुन दिली.
रुग्णवाहिका काही सेकंदात चाैकातून बाहेर पडल्यानंतर गणपती बाप्पा माेरयाचा जयघाेष करण्यात आला. स्वागत कक्षातून सर्व पुणेकरांचे आभार मानण्यात आले. असे प्रसंग विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेकदा घडले. प्रत्येकवेळी पुणेकरांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत रुग्णवाहिकेला वाट माेकळी करुन दिली.