VIDEO- जेजुरीत भर सोमवती यात्रा अन् खंडोबाचा जयघोष
By Admin | Published: March 27, 2017 04:22 PM2017-03-27T16:22:06+5:302017-03-27T16:22:06+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 27 - महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या यात्र त्यानिमित्ताने राज्यभरातून 2 ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या यात्र त्यानिमित्ताने राज्यभरातून 2 लाखांपेक्षाही जास्त भाविकांनी कुलदैवताच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे, दोन दिवसांपासूनच लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज दुपारी 1 वाजता पालखी सोहळा सुरू झाला. सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा कऱ्हातीरी पोहोचेल. त्या ठिकाणी येळकोट येळकोट जयमल्हार', "सदानंदाचा येळकोट' असा खंडोबाचा जयघोष करीत व भंडारा-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करीत कऱ्हा तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने, खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना अंघोळ घालण्यात येणार आहे.
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे सोमवती अमावस्या, या यात्रेमुळे २ दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली होती, आज 2 लाखांपेक्षाही जास्त भाविक जेजुरीत आलेले आहेत. अजूनही येतच आहेत, आज दुपारी 1 वाजता गडावरून पालखी निघून मुख्य मार्गाने धालेवाडी रस्त्याने कऱ्हा नदी तिरी सायंकाळी 5 वाजता दाखल होणार आहे, या कऱ्हेला या भागात गंगेइतकेच पवित्र स्थान आहे, नदी तीरावर पालखी रंभाई मंदिराशेजारी विसावून, नंतर लाखो भाविकांच्या साक्षीने भंडा-याच्या उधळणीत देवाला कऱ्हा स्नान घालण्यात येणार आहे आणि नंतर देवाचा पालखी सोहळा गडाकडे पुन्हा रवाना होणार आहे.
कालपासूनच खंडेरायाच्या गडावर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, उन्हाची तीव्रता प्रचंड जरी असली तरी भाविकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता, लाखो भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते.