व्हि़डीओ : तब्बल 128 वेळा रक्तदान करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:44 PM2019-06-14T15:44:40+5:302019-06-14T15:46:01+5:30

पुण्याच्या रक्ताचे नाते या संस्थेच्या राम बांगड यांनी आत्तापर्यंत 128 वेळा रक्तदान केले आहे.

Video: a man who had donated blood by 128 times | व्हि़डीओ : तब्बल 128 वेळा रक्तदान करणारा अवलिया

व्हि़डीओ : तब्बल 128 वेळा रक्तदान करणारा अवलिया

Next

पुणे : समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने वयाच्या 19 व्या वर्षापासून रक्तदान केलेल्या राम बांगड यांनी आत्तापर्यंत तब्बल 128 वेळा रक्तदान केले आहे. एवढेच नाहीतर आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त ते 19 व्या वेळा प्लेटलेट दान सुद्धा करणार आहेत. 

रक्तदान करण्याचे आवाहन सर्वच माध्यमातून करण्यात येते. परंतु जेवढी रक्ताची गरज असते तितके रक्त संकलित हाेत नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने बांगड यांनी रक्ताचे नाते हि ट्रस्ट सुरु केली. या ट्रस्टच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजाराे रुग्णांना रक्त उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बांगड हे 63 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत तब्बल 128 वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत रुग्णांना लवकरात लवकर रक्त उपलब्ध करुन दिले जाते. केवळ पुण्यातच नाहीतर राज्यातील विविध भागात त्यांच्या संस्थेचे काम सुरु असून इतर राज्यातील रुग्णांना देखील संस्थेकडून मदत करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्यात अनेक रक्तदाते जाेडले गेले आहे. रक्तदान केल्यानंतर चांगलं वाटतं असं ते आवर्जुन सांगतात. 

लाेकमतशी बाेलताना बांगड म्हणाले, वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिल्यांदा रक्तदान केले. मी ज्या भागात राहताे तिथल्या गरिबांचे प्रश्न पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे मनात आले. त्यावेळी शहरात रक्ताचा पुरवठा कमी असायचा तसेच रक्तासाठी खूप धावपळ करावी लागत असे. मी बॅंकेत काम करायचाे. तिथे मी रक्तदानाबाबतचा बाेर्ड लावला हाेता. त्यातून आम्ही एक रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार केली. त्यावेळी ब्लड बॅंक सुद्धा कमी हाेत्या. सध्या पुण्याचा राज्यात रक्त संकलनात दुसरा क्रमांक आहे. यात रक्ताचे नाते या संस्थेच्या हजाराे रक्तदात्यांचे याेगदान आहे. पुण्यात दरवर्षी रक्ताच्या अडीच लाख बॅग लागतात. त्यातील 50 हजार बॅग या रक्ताचे नाते या संस्थेकडून पुरवण्यात येतात. 

पुण्यात रक्तदानाबात माेठी जागृती झाली असून पुणेकर आनंदाने रक्तदान करण्यास येतात. त्यामुळे पुणेकरांचा संस्थेच्या कार्यात माेठा वाटा आहे. एका व्यक्तीने रक्तदान केल्याने त्यातून तीन नागरिकांचे प्राण वाचतात. रक्तदान करण्यासाठी केवळ 10 मिनिटे लागतात. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करायला हवे. आजही आपण पाहिलं तर पुण्यात देखील रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करण्याची गरज आहे. सध्या तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्याप्रमाणेच इतरांनी देखील पुढे येण्याची गरज आहे. त्याचबराेबर पेटलेट दान करण्यासाठी काेणी पुढे येत नाही. प्लेटलेटची विविध आजाराच्या रुग्णांना गरज असते. परंतु तितक्या प्रमाणात दाते पुढे येत नाहीत. त्यामुळे प्लेटलेट दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. असेही बांगड म्हणाले. 

Web Title: Video: a man who had donated blood by 128 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.