Video : देहूत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात फुगडी खेळताना संभाजीराजांचा गेला तोल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:24 PM2021-07-01T20:24:38+5:302021-07-01T20:25:49+5:30
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे आज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या प्रस्थान होणार आहे
पिंपरी: खासदार संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आग्रही आणि आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी, आंदोलनं, बैठका यामुळे त्यांचा दैनंदिन कार्यक्रम देखील व्यस्त आहे. मात्र, आज (दि.१) देहूत छत्रपती संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला. परंतू,याचवेळी त्यांच्यासोबत गमतीदार प्रसंग घडला आणि उपस्थित वारकऱ्यांसह त्यांना देखील हसू आवरता आले नाही.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे आज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या प्रस्थान होणार आहे.सकाळपासूनच देहूत ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण जयहरी चा नामघोष आणि टाळ, मृदंगाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
याचवेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी गुरुवारी देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.मात्र, फुगडी खेळता खेळता संभाजीराजेंचा तोल गेला आणि त्याच क्षणी उपस्थित वारकऱ्यांनी त्यांना सावरलं. हा प्रसंग अनुभवणाऱ्या वारकऱ्यांना आणि खुद्द संभाजीराजे यांना देखील हसू आवरता आले नाही.
तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात फुगडी खेळताना संभाजीराजांचा गेला तोल अन्....#PandharpurWari#TukaramMaharajPalkhiSohlapic.twitter.com/bfIrYPXlMJ
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2021
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास संभाजीमहाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संत तुकाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अनुबंध उलगडताना संभाजी महाराज म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार व्यक्त करतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानले होते.
अन् तुकाराम महाराजांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे, अशी आमची भावना आहे.’’