Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 01:13 PM2023-03-12T13:13:22+5:302023-03-12T13:14:04+5:30
राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही, आपले प्रश्न हक्काने मांडा
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील महिन्यात सहजीवन व्याख्यानमाला या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमानंतर तेथील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांशी संवाद साधला. त्यामध्ये ५० ते ६० नागरिकांनी मनसेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करत राज ठाकरे यांनी त्या ५० ते ६० इच्छुकांची आबा बागुल उद्यान येथे सकाळी भेट घेतली. आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी ५० ते ५२ नागरिक उपस्थित होते. त्यांच्याशी लोकमतने संवाद साधला. तेव्हा राज यांनी तुमचे प्रश्न, अडचणी हक्काने मांडण्याचा सल्ला या नागरिकांना दिला आहे.
''तुम्ही सामान्य नागरिक आहात. समाजातील समस्यांवर तम्ही काय करू शकता यासाठी पुढाकार घ्या. अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक लढवायला पाहिजे असं काही नाही. अशा प्रकारचे मार्गदर्शन राज ठाकरे यांनी आम्हाला केले असल्याचे नागरिकांनी सांगितले. आम्हाला अपेक्षित नव्हतं कि एक राजकारणी शब्द देतो आणि खरच तो कार्यक्रम झाला याच कौतुक वाटतंय. आम्ही राज ठाकरेंनी सांगितल्यानुसार नक्कीच काम करणार आहोत.''
राज ठाकरे अंध विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतील
सध्यस्थितीत अंध विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर आम्ही राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला प्रश्न सुटली असं विश्वास निर्माण झाला आहे. तसेच त्यांनी अंध विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आम्हाला दिले असल्याचे एका अंध संस्थेच्या महिलेने सांगितले आहे.
राजकारण सोडून ही चर्चा झाल्याने नागरिक समाधानी
राज ठाकरे शब्दाला मान ठेवून आले यातच आम्हाला आनंद झाला, तुम्ही तुमचे प्रश्न मांडा असे त्यांनी यावेळी सांगितले. राज साहेबांशी सुंदर चर्चा झाली. तुम्ही कुठल्याही पक्षात काम करा, फक्त महाराष्ट्रासाठी काम करा असंही ते म्हणाले आहेत. ही चर्चा राजकारण सोडून झाल्याने नागरिक समाधानी होते.
राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही
सहजीवन व्याख्यानमालेत राज साहेबांनी जे राजकारणात येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तिथल्या संयोजकांकडे नावे दया असे सांगितले होते. त्यामध्ये ५८ लोक होती. त्यापैकी ५२ आज आले होते. त्या लोकांना राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत राजकारणात येण्यासाठी काय अडचणी येत आहेत का? याबद्दल हे राज साहेबांनी सर्वांशी चर्चा केली. काही लोकांना मुंबईला बोलावलंय, त्यांच्या कौशल्यानुसार कामे देण्यात येणार असल्याचे मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी सांगितले आहे.